रुग्णसेवेचे व्रत कायम जोपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 AM2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:46+5:30

जगातील पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या जयंतीचा कार्यक्रम जागतिक परिचारिका दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. ही जयंती अहेरीचे उपजिल्हा रुग्णालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण वानखेडे यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका व परिचारिका उपस्थित होत्या.

The vow of patient service will be maintained forever | रुग्णसेवेचे व्रत कायम जोपासणार

रुग्णसेवेचे व्रत कायम जोपासणार

Next
ठळक मुद्देपरिचारिकांनी घेतली शपथ : अहेरीच्या रुग्णालयात कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत सर्व परिचारिकांनी १२ मे रोजी मंगळवारला रुग्णसेवेचे व्रत कायम जोपासण्याची शपथ घेतली.
जगातील पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या जयंतीचा कार्यक्रम जागतिक परिचारिका दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. ही जयंती अहेरीचे उपजिल्हा रुग्णालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण वानखेडे यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका व परिचारिका उपस्थित होत्या. फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्ज्वलीत करून आणि केक कापून त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रेरणा झाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Web Title: The vow of patient service will be maintained forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.