शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम मॉक पोलिंगद्वारे मतदार जागृती

By admin | Updated: September 25, 2014 23:24 IST

मतदारांना जागृत करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणाहून मतदार मदत केंद्रामार्फत जनजागृती केली जात आहे. ईव्हीएम मॉक पोलिंगच्या माध्यमातून मतदार जनजागृतीबाबत

गडचिरोली : मतदारांना जागृत करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणाहून मतदार मदत केंद्रामार्फत जनजागृती केली जात आहे. ईव्हीएम मॉक पोलिंगच्या माध्यमातून मतदार जनजागृतीबाबत प्रात्यक्षिक स्वरूपात उपक्रम राबविले जात आहेत. याचा जिल्ह्यातील मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.मतदार जनजागृतीबाबत प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची निवडणूक निरीक्षक कृपाशंकर यादव यांनी पाहणी केली. त्याबरोबरच अनेक महत्वपूर्ण सूचनाही केल्या. गडचिरोली शहरात इंदिरा गांधी चौक, जिल्हा परिषद शाळा तसेच अन्य केंद्रावरून मतदार जागृती केली जात आहे. याची पाहणीही निवडणूक निरीक्षक कृपाशंकर यादव यांच्यासह जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केली. जिल्ह्यात मतदार जागृतीबाबत प्रशासनातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम समाधानकारक असल्याचे मत कृपाशंकर यादव यांनी व्यक्त केले. गडचिरोली, अहेरी व आरमोरी विधानसभा क्षेत्रात विविध शाळा, सार्वजनिक ठिकाणाहून मतदार, भावी मतदारांना बॅलट, कंट्रोल युनिट यांच्या सहाय्याने मतदान करण्याबाबतची माहिती ईव्हीएम मॉक पोलिंग प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात येत आहे. त्याबरोबरच मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले जात आहे व मतदारांमधील उत्साह वाढावा या दृष्टीने प्रात्यक्षिकांवर भर दिले जात आहे. मतदारांमध्ये असलेल्या अनेक शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यावर निवडणूक विभाग भर देत आहे. युवकांपासून वयोवृद्धांपर्यंत मतदार मदत केंद्रांना नागरिक भेट देत असून ईव्हीएम मॉक पोलिंगचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले आहे.