शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

विसोरा-शंकरपूर मार्ग खड्ड्यात

By admin | Updated: September 21, 2014 23:51 IST

देसाईगंज तालुक्यातील विसोरा ते शंकरपूर दरम्यान दोन किमी अंतर असलेल्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी अनेकदा गावकऱ्यांनी

विसोरा : देसाईगंज तालुक्यातील विसोरा ते शंकरपूर दरम्यान दोन किमी अंतर असलेल्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी अनेकदा गावकऱ्यांनी प्रशासनाकडे लावून धरली होती. मात्र संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सदर मार्ग खड्ड्यात असल्याचे चित्र आहे. देसार्इंज-कुरखेडा या मुख्य मार्गावर विसोरा व शंकरपूर हे अवघ्या दोन किमी अंतरावर असलेली महत्त्वाची गावे, या दोन गावांच्या दरम्यान गाढवी नदी वाहते. सद्यस्थितीत या नदीवर असलेल्या ठेंगण्या पुलामुळे पावसाच्या दिवसात आठ ते दहा वेळा रहदारी बंद होते. त्यामुळे सदर नदीवर मागील तीन वर्षापासून उंच पूल बांधण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु अजूनही हे काम अपूर्णच आहे. पावसाच्या दिवसात काम बंद राहत असल्यामुळे प्रत्यक्ष कामाच्या पाहणीवरून येत्या वर्षभरातही हे काम पूर्ण होणार की नाही, यावर प्रश्नचिन्हच आहे. या पुलाच्या बांधकामासाठी संबंधीत विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता उंच करण्यासाठी डांबरावर मातीचा भरणा केला आहे. यामुळे रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की, विसोरा ते शंकरपूर हे दोन किलोमीटरचे अंतर पार करायला पाच मिनिटाऐवजी आजघडीला अर्धा तास लागत आहे. वडसा ते कुरखेडा या मार्गे ये-जा करण्यासाठी वडसा-एकलपूर-कोरेगाव-शंकरपूर-कुरखेडा हा पर्यायी मार्ग आहे. मात्र या पर्यायी मार्गाने गेल्यास १० ते १२ किमी अंतराचा फेरा होतो. मात्र असे असले तरीही देसाईगंज-विसोरा-शंकरपूर-कुरखेडा याच मार्गाने सर्वात जास्त वाहनधारक खड्डे, धुळीचा त्रास सहन करून वाहने चालविणे पसंत करत आहेत, असे दिसते. परिणामी विसोरा-शंकरपूर या मार्गाची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग गडचिरोली, नागपूर, कोरची, या शहरांकडे जात असल्याने जड वाहनांची नेहमीच वर्दळ असते तरीही रस्त्याच्या दुरवस्थेकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. या मार्गाची दुरूस्ती करण्यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. संबंधीत विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याची नागरिकांची चर्चा आणि या बाबतीत आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्त्यावर पडलेले लहान मोठे शेकडो खड्डे तत्काळ बुजवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)