शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त विजेसाठी विदर्भवादी आता देणार लढा

By admin | Updated: September 25, 2015 01:54 IST

राज्यातील सर्वाधिक ५ हजार ६०० मेगावॅट वीज विदर्भात निर्माण होते. या विजेवर मुंबई, पश्चिम महाराष्ट्र व पुणे यांना वीज पुरवठा केला जातो.

राम नेवले यांची माहिती : अकोला, नागपूर व वणी येथे होणार आंदोलनगडचिरोली : राज्यातील सर्वाधिक ५ हजार ६०० मेगावॅट वीज विदर्भात निर्माण होते. या विजेवर मुंबई, पश्चिम महाराष्ट्र व पुणे यांना वीज पुरवठा केला जातो. केवळ २२०० मेगावॅट वीज विदर्भात वापरली जाते. उर्वरित वीज राज्याच्या इतर भागात जाते. यात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी व गळती होत आहे. त्यामुळे विजेचे भाव वाढतात. मात्र हे वाढलेल्या भावाची रक्कम विदर्भातील जनतेच्या खिशातून वसूल केली जात आहे. या प्रकाराविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. विदर्भात चार ठिकाणी वीज प्रकल्प आहेत. या वीज प्रकल्पांमुळे कोळसा, पाणी यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. प्रदूषणातही वाढ झाली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने केलेल्या अभ्यासानुसार प्रति युनिट वीज निर्मितीसाठी केवळ २.४० पैसे खर्च येतो. असे असतांना विजेचे दर ३ रूपयांपासून ११ रूपयांपर्यंत आकारले जात आहेत. ही विदर्भातील जनतेची लुट आहे. या विरोधात ३ आॅक्टोबरला नागपूर येथे व ९ आॅक्टोबरला अकोला येथे आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर २५ आॅक्टोबर रोजी वणी येथे कोळसा रोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनामुळे वीज प्रभावित झाल्यानंतरच सरकारला येथील वीज प्रकल्पांची किंमत कळेल. या आंदोलनाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर बैठका घेण्यात येत असल्याची माहिती राम नेवले यांनी दिली. यावेळी अरूण मुनघाटे, अनिल तिडके, विष्णु आष्टीकर, नामदेवराव गडपल्लीवार, रमेश भुरसे, राजेंद्रसिंह ठाकुर, राजू जक्कनवार, श्याम वाढई, सुधाकर नाईक, रमेश उप्पलवार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)