पशु चिकित्सालयाची इमारत जीर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST2021-03-25T04:35:30+5:302021-03-25T04:35:30+5:30

धानोरा तालुका अतिदुर्गम आहे. ताल्युक्यात धानाची शेती केली जाते. त्यामुळे शेतकरी पशुधनाचा वापर करतात. पशूंना विविध आजारांची लागण झाल्यास ...

Veterinary hospital building in dilapidated condition | पशु चिकित्सालयाची इमारत जीर्णावस्थेत

पशु चिकित्सालयाची इमारत जीर्णावस्थेत

धानोरा तालुका अतिदुर्गम आहे. ताल्युक्यात धानाची शेती केली जाते. त्यामुळे शेतकरी पशुधनाचा वापर करतात. पशूंना विविध आजारांची लागण झाल्यास किंवा लसीकरणासाठी व कृत्रिम रेतनासाठी जनावरांना पशुचिकित्सालयात आणले जाते. धानोरा येथील श्रेणी १ च्या चिकित्सालयात सहायक आयुक्त आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, वरिष्ठ लिपिक, ड्रेसर,परिचर अशी पाच पदे मंजूर आहेत. परंतु येथील चार पदे रिक्त असून केवळ पशुधन विकास अधिकारी कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून वर्षांपासून दुरुस्तीअभावी इमारत जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात छतातून पाणी गळते. व्हरांड्यातील लाकडी फाटे कुजलेले आहेत. अनेक फाटे तुटून लाेंबकळत आहेत. कवेलू फुटलेले आहेत, जनावरांना उपचारासाठी आणणाऱ्या पशुपालकांच्या डाेक्यावर कवेलू व फाटे काेसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे काही नागरिकांना याचा अनुभव आला आहे. इमारतीकडे पाहून हे पशु चिकित्सालय आहे की गुरांचा कोंडवाडा, असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण हाेताे. त्यामुळे इमारतीची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Veterinary hospital building in dilapidated condition