शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांची पडताळणी करा

By admin | Updated: June 24, 2016 02:02 IST

२०१५- १६ च्या आॅनलाईन संच मान्यतेनुसार अतिरिक्त व रिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली असून त्यानुसार

शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणीगडचिरोली : २०१५- १६ च्या आॅनलाईन संच मान्यतेनुसार अतिरिक्त व रिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली असून त्यानुसार शाळा व संस्थेतून ठरणाऱ्या शिक्षकांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही शाळांमध्ये प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु शासनाच्या परिपत्रकातील मार्गदर्शक तत्त्वानुसार शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे अपेक्षित होते. मात्र काही संस्थांमध्ये आपल्या मर्जीतील शिक्षकांना अभय देऊन अनेक शिक्षकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची पडताळणी काटेकोर करावी, अशी मागणी विमाशिच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील नियम १२ नुसार कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी तयार करून त्यातील कनिष्ठतम कायम कर्मचारी अतिरिक्त ठरविण्याचे शासन निर्णयात नमुद असतानाही या नियमाला बगल दिली जात आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची पडताळणी काटेकोरपणे करावी, अशी मागणी विमाशिच्या वतीने शिक्षणाधिकारी (मा.) नानाजी आत्राम यांच्याकडे करण्यात आली. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, अजय लोंढे, शेमदेव चाफले, अनिल गांगरेड्डीवार, यशवंत रायपुरे, महेंद्र वाकडे, सुरेंद्र मामीडवार, यादव बानबले, संजय खांडरे, नरेंद्र भोयर, संजय घोटेकर, संजय दौरेवार, रवींद्र बांबोळे, टेकाम, निमजे, टिकले, उराडे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)