शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाची झाडाला धडक; चालक गंभीर

By admin | Updated: May 12, 2017 02:31 IST

आलापल्लीवरून मुलचेरा तालुक्यातील कांचनपूरकडे जाणाऱ्या भरधाव बोलेरो पिकअप वाहनाची झाडाला धडक बसल्याने

मालवाहू वाहनाचे नुकसान : कांचनपूर-मुलेचरादरम्यानची घटना लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : आलापल्लीवरून मुलचेरा तालुक्यातील कांचनपूरकडे जाणाऱ्या भरधाव बोलेरो पिकअप वाहनाची झाडाला धडक बसल्याने वाहनचालक गंभीर जखमी झाल्याची घटना कांचनपूर-मुलचेरादरम्यान नदीजवळ बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. अजित रंजन साना (३४) रा. कांचनपूर ता. मुलचेरा असे जखमी वाहनचालकाचे नाव आहे. एमएच-३३-जी-२०३४ क्रमांकाच्या स्वत:च्या बोलेरो पिकअप वाहनाने अंजित साना आलापल्लीवरून कांचनपूरकडे जात होते. दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाडाला धडक बसली. यात वाहनचालक अजित साना गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी बोलाविण्यात आली. जखमी अजित साना याला उपचारासाठी चंद्रपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दुचाकी अपघातात वायरमन ठार एटापल्ली : वागेसरी येथील विद्युत पुरवठा दुरूस्तीचे काम आटोपून दुचाकीने कसनसूरला परत जाताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने वायरमन गंभीर जखमी झाला व एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांचा रात्री ९.३० वाजता मृत्यू झाला. सदर अपघाताची घटना हालेवारा-कसनसूर मार्गावरील शिव मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. सुनील ठाकरे (३५) असे अपघातात ठार झालेल्या वायमनचे नाव आहे. या अपघातात दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्यानंतर जखमी अजित साना याला प्रथम कसनसूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले. येथून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात रात्री ९.३० वाजता आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आहे. सदर अपघातातील दुसरा दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाल्याचे मृतक सुनील ठाकरे याच्या नातेवाईकांनी सांगितले.