शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
3
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
4
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
5
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
6
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
7
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
8
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
9
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
10
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
11
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
12
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
13
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
14
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
15
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
16
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
17
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
18
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
19
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
20
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रिक्तपदाने शिक्षण क्षेत्रातील पर्यवेक्षिय यंत्रणा पांगळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बाराही तालुक्यात मिळून जवळपास १५५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजार शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हास्तरावर जि.प.मध्ये शिक्षण विभाग असून या विभागामार्फत तालुक्यावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागातील शाळा, तेथील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी गुणवत्ता यासह विविध शैक्षणिक बाबींवर तालुक्याची पर्यवेक्षिय यंत्रणा नियंत्रण ठेवत असते.

ठळक मुद्देशाळांवर परिणाम : प्रभारींच्या खांद्यावर नियंत्रण व तपासणीची जबाबदारी

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा स्तर व गुणवत्ता राखून ते टिकविण्याची जबाबदारी तालुकास्तरावरील या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. मात्र रिक्त पदांमुळे शिक्षण विभागातील पर्यवेक्षिय यंत्रणा पांगळी झाली आहे. सदर पर्यवेक्षिय यंत्रणेतील ६५ पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने याचा परिणाम शाळांच्या नियंत्रणावर होत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बाराही तालुक्यात मिळून जवळपास १५५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजार शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हास्तरावर जि.प.मध्ये शिक्षण विभाग असून या विभागामार्फत तालुक्यावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागातील शाळा, तेथील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी गुणवत्ता यासह विविध शैक्षणिक बाबींवर तालुक्याची पर्यवेक्षिय यंत्रणा नियंत्रण ठेवत असते. सदर पर्यवेक्षिय यंत्रणेमध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख आदींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे अहेरी उपविभागात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांची अधिकाधिक पदे रिक्त असल्याने या भागातील जि.प.प्राथमिक शाळांच्या दर्जा व गुणवत्तेवर परिणाम होत आहे. गडचिरोली, धानोरा, भामरागड या तीनच पंचायत समितीस्तरावर नियमित गटशिक्षणाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. इतर नऊ तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी प्रभारी अधिकाºयाच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. विशेष करून अहेरी उपविभाग व उत्तर भागातील कोरची, कुरखेडा येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी पदाचा हा अनुशेष कायम आहे.
जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत १२ तालुके मिळून शिक्षण विस्तार अधिकाºयांची एकूण ३१ पदे मंजूर आहेत. यापैकी १८ पदे भरण्यात आले असून १३ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये धानोरा, एटापल्ली, गडचिरोली येथील प्रत्येकी एक, आरमोरी तालुक्यात दोन, चामोर्शी दोन, अहेरी दोन व सिरोंचा तालुक्यातील चार पदांचा समावेश आहे. केंद्र प्रमुखांची पदे रिक्त असल्याने या पदाचा प्रभार ज्येष्ठ शिक्षक तसेच मुख्याध्यापकांकडे सोपविला जात असतो.

केंद्रप्रमुखांची ४५ पदे रिक्त
बाराही पंचायत समिती मिळून जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची एकूण १०१ पदे मंजूर आहेत. यापैकी ५६ पदे भरण्यात आली असून ४५ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये सर्वाधिक अहेरी व सिरोंचा तालुक्यातील पदांचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यात आष्टी, गणपूर, गडचिरोली तालुक्यात मुरखळा, येवली, आंबेशिवणी, आरमोरी तालुक्यात डोंगरगाव, मोहझरी, आरमोरी, मुलचेरा तालुक्यात गांधीनगर, मुलचेरा, सुंदरनगर, कुरखेडा तालुक्यात कढोली, कोरची तालुक्यात देऊळभट्टी, बेतकाठी व कोरची तसेच धानोरा तालुक्यात येरकड, दुर्गापूर, मुरूमगाव, पेंढरी, एटापल्ली तालुक्यात गट्टा, कसनसूर, गेदा, कोटमी, एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात लाहेरी, मन्नेराजाराम, भामरागड व नारगुंडा आदी ठिकाणची केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत.

दुर्गम भागातील शाळा रामभरोसे
अहेरी तालुक्यात अहेरी, देवलमरी, आलापल्ली, राजाराम, उमानूर, जिमलगट्टा, देचलीपेठा, पेरमिली, दामरंचा आदी नऊ ठिकाणची केंद्रप्रमुखांची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. तसेच सिरोंचा तालुक्यात सिरोंचा, आरडा, झिंगानूर, रंगय्यापल्ली, रेगुंठा, टेकडाताला, आसरअल्ली व नदीकुडा आदी आठ ठिकाणची केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. स्वतंत्र केंद्रप्रमुख नसल्याने दुर्गम भागातील शाळांमधील सुविधा, तेथील गुणवत्ता व विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पर्यवेक्षिय यंत्रणा या उपविभागात पांगळी असल्याने दुर्गम भागातील शाळा रामभरोसे आहेत. परिणामी अहेरी उपविभागातील अनेक शाळांचे शिक्षक आठवड्यातून एक ते दोन दिवस शाळेला दांडी मारतात. मात्र तपासणीच्या अहवालात सर्व व्यवस्थित दाखविले जाते.

टॅग्स :Socialसामाजिक