शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

माहितीचा उपयोग जीवनमान उंचावण्यासाठी करा

By admin | Updated: January 31, 2016 01:25 IST

लोक माहिती अभियानादरम्यान कधीही मिळाली नाही, एवढी महत्त्वाची माहिती विविध व्याख्यानसत्रातून तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

राणी बंग यांचे आवाहन : आरमोरीत लोक माहिती अभियानाचा समारोपआरमोरी : लोक माहिती अभियानादरम्यान कधीही मिळाली नाही, एवढी महत्त्वाची माहिती विविध व्याख्यानसत्रातून तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. या माहितीचा प्रत्यक्ष उपयोग होण्यासाठी सदर उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. लोक माहिती अभियानाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा उपयोग जीवनमान उंचाविण्यासाठी करा, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राणी बंग यांनी केले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने शनिवारी स्थानिक महात्मा गांधी स्व. न.प. वाणिज्य महाविद्यालयात लोक माहिती अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर वनमाळी, उपप्राचार्य डॉ. रमेश ठोंबरे, संजय आर्वीकर, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार, प्रा. योगिता सानप, शुभदा देशमुख, जि.प.चे महिला व बाल कल्याण अधिकारी सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात आरमोरी येथील लोक माहिती अभियान यशस्वी झाले. या माहितीचा उपयोग स्वत:सह समाजासाठी करावा, असे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी आपल्या भाषणातून सांगितले. संचालन सुरेश गांजरे यांनी केले तर आभार संजय आर्वीकर यांनी मानले. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना गट विकास अधिकारी मनोज सोनोने यांच्या हस्ते पारितोषीक देण्यात आले. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)माता व बालमृत्यू रोखण्याच्या उपाययोजनांवरही मार्गदर्शनजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार यांनी ‘मिशन इंद्रधनुष्य’ या विषयावरील व्याख्यानात संपूर्ण बालकांचे लसीकरण माता व बालमृत्यू रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजनांबाबत चित्रफितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. याशिवाय कृषी विकास व महिला या विषयावर बोलताना महिलांनी केवळ शिक्षीत नव्हे तर सुशिक्षीत होण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. शुभदा देशमुख यांनी महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.