शहरं
Join us  
Trending Stories
1
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
"२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा खोचक सवाल
4
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
5
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
6
Virat Kohli Record : किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! एका डावात ५ विक्रमांची नोंद
7
Cannes 2026: मराठमोळ्या अभिनेत्याने मान गर्वाने उंचावली! झळकला कान्सच्या रेड कार्पेटवर, म्हणाला...
8
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
10
Neet Exam Case: कन्सल्टन्सीच्या नावे शोधायचा सावज, शुभमने केले होते स्वत:चे ‘नीट’ ब्रॅण्डिंग
11
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
12
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
13
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
14
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
15
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
16
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
17
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
18
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
19
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
20
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश

By admin | Updated: July 11, 2015 02:16 IST

नामांकित शाळेत प्रवेशासाठी जिल्ह्यातील तीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांना प्रत्येकी एक हजार या हिशोबाने

तीन आदिवासी प्रकल्प : शाळा निवडण्याची प्रक्रिया सुरू
गडचिरोली : नामांकित शाळेत प्रवेशासाठी जिल्ह्यातील तीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांना प्रत्येकी एक हजार या हिशोबाने तीन हजार विद्यार्थी गोळा करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. १० जुलैपर्यंत या तिन्ही प्रकल्पांनी १ हजार ९७५ विद्यार्थ्यांची अंतिम यादी तयार केली असून त्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश देण्याची तयारी सुरू केली आहे.
आदिवासी विकास विभागाने आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी यासाठी आश्रमशाळा स्थापन केल्या आहेत. या आश्रमशाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर त्यांच्या राहण्याची सोयही संबंधित आश्रमशाळांमध्ये करण्यात येते. मात्र आश्रमशाळांचा दर्जा सुमार झाला आहे. परिणामी बरेचसे पालकवर्ग आश्रमशाळांमध्ये आपल्या पाल्याला पाठविण्यासाठी तयार होत नाही. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाचे महत्त्वही वाढत चालले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक प्रकल्पातून एक हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत टाकले जाईल, असा निर्णय घेतला. संबंधित विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून ते राहण्याचा खर्च आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने उचलला जाणार आहे.
प्रत्येक प्रकल्प कार्यालयाला एक हजार विद्यार्थी गोळा करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. या योजनेनुसार पहिली व पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार होता. गडचिरोली जिल्ह्यात एकूण तीन प्रकल्प कार्यालये आहेत. शासनाचा आदेश धडकताच तिन्ही प्रकल्प कार्यालये विद्यार्थी शोधण्याच्या कामास लागले. हे काम आश्रमशाळेच्या शिक्षकांवरही सोपविण्यात आले.
प्रकल्प कार्यालयाकडे आलेल्या अर्जातून छाननी केल्यानंतर तिन्ही प्रकल्प कार्यालयांनी अंतिम यादी तयार केली आहे. गडचिरोली प्रकल्पाने ८०० विद्यार्थ्यांची अंतिम यादी सद्य:स्थितीत बनविली आहे. तर भामरागड प्रकल्पातील ७१५ व अहेरी प्रकल्पातील ४६० विद्यार्थ्यांची यादी बनली आहे. अशा एकूण तिन्ही प्रकल्पातील मिळून १ हजार ९७५ विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाने ठरवून दिलेल्या नामांकित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)