शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

२० लाख भाविक पोहोचले

By admin | Updated: July 21, 2015 02:29 IST

गोदावरी नदीचा राज्यातील शेवटचा प्रवास सिरोंचा तालुक्यातून होतो. नाशिक येथे कुंभमेळा सुरू झाल्यापासून गोदावरी

पुष्कर मेळावा : सिरोंचा तालुक्यातून तेलंगणात गर्दी वाढली
सिरोंचा : गोदावरी नदीचा राज्यातील शेवटचा प्रवास सिरोंचा तालुक्यातून होतो. नाशिक येथे कुंभमेळा सुरू झाल्यापासून गोदावरी नदीच्या काठावर तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात पुष्कर महोत्सव साजरा केला जात आहे. आतापर्यंत या पुष्कर मेळाव्यात मागील पाच दिवसांत २० लाख भाविकांनी पवित्र स्नान केले आहे.
यात महाराष्ट्रातील हजारो भाविकांचा समावेश आहे. शनिवार, रविवारी सुटी आल्यामुळे तब्बल १० लाख भाविकांनी पुष्कर मेळाव्याला भेट देऊन गोदावरीत नदीत स्रान केले. हैद्राबाद शहरापासून ते संपूर्ण तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र तसेच छत्तीसगडमधून मोठ्या संख्येने भाविक पुष्कर मेळाव्यात दाखल होत आहेत. तेलंगणा सरकारने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पोलीस सुरक्षा बंदोबस्तासह संपूर्ण व्यवस्था केली. विशेष म्हणजे या पुष्कर मेळाव्यात भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय तेलंगणा सरकारने होऊ दिली नाही. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातूनही हजारो भाविक सिरोंचा येथे येऊन तेथून नावेतून गोदावरी नदीत स्नान करीत आहेत.
गेल्या पाच दिवसात २० लाखांवर भाविकांनी कालेश्वर व मुक्तेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या हद्दीतील या गोदावरी नदीच्या घाटावर पुष्कर मेळाव्यात कुठलीही व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही. गडचिरोली पोलिसांचा बंदोबस्त वगळता या ठिकाणी महाराष्ट्र सरकारची उदासीनता दिसून येत असल्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी तेलंगणा सरकारचे कौतुक करून महाराष्ट्र राज्य सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या पुष्कर मेळाव्याला तेलंगणा विधानसभेचे अध्यक्ष मधुसुदन चारी, तेलंगणाचे महसूल मंत्री इटला राजेंदर, आरोग्यमंत्री व काँग्रेसचे माजी खा. लगड पाटी राजगोपाल यांच्यासह रोज दोन ते तीन मंत्री भेट देत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

हंसराज अहीर यांनीही केली बासर येथे पूजा
४केंद्रीय रसायन व खत मंत्री हंसराज अहीर यांनी तेलंगणा राज्याच्या बासर येथे जाऊन पुष्कर मेळाव्यात महापूजा केली. अहीर यांनी सिरोंचाच्या गोदावरी घाटांकडे पूजेसाठी पाठ फिरवत तेलंगणा राज्याच्या बासर येथे जाऊन महापूजा केल्यामुळे या भागातील नागरिकांनी केंद्रीय मंत्र्यांना आपल्या जुन्या मतदार संघाचा आता विसर पडला आहे, अशी भावना बोलून दाखविली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्रामही पुष्कर मेळाव्याकडे फिरकले नाही.