गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुके आपत्तीग्रस्त घोषित ! शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 20:16 IST2025-10-13T20:14:51+5:302025-10-13T20:16:41+5:30
शासनाकडून मिळणार विविध सवलती : पावसाळ्यात बसला विविध पिकांना अतिवृष्टीचा फटका

Twelve talukas of Gadchiroli district declared disaster affected! Farmers get relief
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील बाराही तालुके आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. त्यातील १० तालुके पूर्णतः बाधित व दोन तालुके अंशतः बाधित घोषित केले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक पाऊस पडतो. तसेच नद्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे पुराचा फटका शेतीला बसते. लाखो रुपये खर्चुन शेतात विविध पिकांची लागवड शेतकरी करतात. मात्र, पुरामुळे पीक नष्ट होते. अशावेळी सरकारी मदतीची आस शेतकरी लावून धरतात. संबंधित तालुक्यात झालेले नुकसान लक्षात घेऊन सरकार आपत्तीग्रस्त तालुके घोषित करीत असते. राज्य सरकारने राज्यातील २८२ तालुके आपत्तीग्रस्त घोषित केले आहेत. त्यात गडचिरोली तालुक्यातील बाराही तालुक्यांचा समावेश आहे.
दोन तालुके अशंतः बाधित
चामोर्शी व कोरची हे दोन तालुके अशंतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. या तालुक्यांमधील संपूर्ण शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार नाही. ज्या मंडळात नुकसान भरपाई झाली, त्याच मंडळातील शेतकऱ्यांना किंवा इतरांना लाभ मिळेल. पूर्णतः बाधित म्हणून घोषित असलेल्या तालुक्यातील सर्वच नागरिकांना सवलतींचा लाभदिला जाईल.
अॅग्रीस्टॅक नोंद नसेल तर ई-केवायसी आवश्यक
ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी होऊन अॅग्रीस्टॅकमध्ये ई-केवायसी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माकडून मिळणार विविध सवलती, पावसाळ्यात बसला अतिवृष्टीचा फटकाहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळते. त्यांना ई-केवायसी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी नाही त्यांना प्रचलित पद्धतीने ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
कर्ज वसुलीस स्थगिती
संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट दिली जाईल. सहकारी कर्जाचे पुनर्गठन केले जाईल. शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस एक वर्षाची स्थगिती दिली जाईल. तिमाही वीज बिलात सूट, परीक्षा शुल्कात माफी तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफ केली जाईल.
जमीन खरडलेल्या शेतकऱ्यांना तीन लाख
अतिवृष्टी व पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमीन खरडून गेल्या आहेत ती जमीन लागवडीयोग्य करण्यासाठी तीन लाख रुपये प्रति हेक्टर या मर्यादेत दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जाईल.
शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वितरण सुरू
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रामुख्याने ऑगस्ट महिन्यातच नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन शासनाकडून मदतनिधी प्राप्त झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतनिधी जमा सुद्धा झाला आहे. दिवाळीपूर्वी संपूर्ण निधी वितरित करण्याचे निर्देश शासनाने प्रशासनाला दिले आहेत.
१० हजार नुकसान झालेल्यांना पीक विम्याचाही लाभ
रुपये रबी हंगामातील बियाणे खरेदी करण्यासाठी दिले जातील. या शेतकऱ्यांना रबी हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेता येणे शक्य होणार आहे.