शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींनी सर्वप्रकारचे आक्रमण परतावून लावावे

By admin | Updated: January 17, 2016 01:16 IST

अलीकडे आदिवासींवर सामाजिक व सांस्कृतिक आक्रमण होत असून, राजकीय व्यवस्थाही त्याला न्याय देण्यात अपयशी ठरत आहे.

चर्चासत्राचा समारोप : विविध विषयांवर परिसंवादात विचारमंथनगडचिरोली : अलीकडे आदिवासींवर सामाजिक व सांस्कृतिक आक्रमण होत असून, राजकीय व्यवस्थाही त्याला न्याय देण्यात अपयशी ठरत आहे. अशावेळी आदिवासींनी संघटित होऊन सर्वप्रकारचे आक्रमण परतावून लावावे, असा सूर ‘आदिवासींची स्थिती व आव्हाने’ या विषयावर आयोजित विविध चर्चासत्रांतील मान्यवरांनी दुसऱ्या दिवशी शनिवारी काढला.माजी आमदार दिवंगत नेताजी राजगडकर यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी सोशल फोरम व अखिल भारतीय आदिवासी महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवन कला दालनात दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी पहिल्या सत्रात ‘आदिवासी-सांस्कृतिक-धार्मिक आक्रमणाचा धोका’ या विषयावर नागेश चौधरी म्हणाले, हिंदुराष्ट्राचे पुरस्कर्ते नियोजनबद्धरित्या आदिवासींवर सांस्कृतिक आक्रमण करीत आहेत. आदिवासींना वनवासी बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. समरसतेच्या माध्यमातून त्यांना विषमताच पेरायची असून, समरसता व समता यांच्यात फरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समतेचं राष्ट्र निर्माण करण्यासाठी आदिवासी, दलित व ओबीसींनी एकत्रितरित्या हिंदूराष्ट्रनिर्मितीचे प्रयत्न हाणून पाडावे, असे आवाहनही नागेश चौधरी यांनी केले. अध्यक्षीय भाषणात हिरालाल येरमे म्हणाले, एकीकडे संस्कृत विद्यापीेठे निर्माण केली जातात, मग गोंडी विद्यापीठ का निर्माण केले जात नाही, असा सवालही हिरालाल येरमे यांनी उपस्थित केला. दुसऱ्या सत्रात ‘आदिवासी साहित्य:वाटचाल आणि आव्हाने’ या विषयावर राजेश मडावी म्हणाले, प्रस्थापित साहित्यामुळे सुशिक्षित आदिवासींचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे हा समाज आदिवासी साहित्याकडे मोठया आशेने बघायला लागला आहे. निव्वळ कलावादी साहित्याला अर्थ नसून, त्याला वैचारिक अधिष्ठान असणे गरजेचे आहे, असेही मडावी यांनी स्पष्ट केले. डॉ.अशोक पळवेकर म्हणाले की, समाज, साहित्य, तत्वज्ञान वेगवेगळे करुन कुठल्याही समूहाच्या जीवनाचा साकल्याने अभ्यास करता येत नाही. तत्वज्ञानाचा गाभा समुहापर्यंत पोहचविण्यासाठी ते लालित्याच्या अंगानेच पोहचवावे लागते. कार्यकर्ता हा प्रथम तत्वाज्ञानाशी जुळतो. त्यामुळे कार्यकर्ता हाच साहित्याचा प्रचारक असतो, असेही ते यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)