शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वडधा-देशपूर मार्गावरील प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

पुलावर खड्डे पडले असून लोखंडी सलाखी बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने रस्ता व पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी देशपूर, कुरंजा, देवीपूर आदी गावातील नागरिकांनी केली आहे. सदर मार्गावर दोन ते तीन वर्षांपूर्वी पुलाचे काम मंजूर करण्यात आले. मात्र हे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही.

ठळक मुद्देदुरूस्तीकडे दुर्लक्ष : मंजूर पुलाचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवडधा : आरमोरी तालुक्यातील वडधा-देशपूर या मार्गाची दुरवस्था झाली असून पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर मार्गावरील प्रवास खडतर व धोकादायक बनला आहे.पुलावर खड्डे पडले असून लोखंडी सलाखी बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने रस्ता व पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी देशपूर, कुरंजा, देवीपूर आदी गावातील नागरिकांनी केली आहे. सदर मार्गावर दोन ते तीन वर्षांपूर्वी पुलाचे काम मंजूर करण्यात आले. मात्र हे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही. पावसाळ्यात हलकासाही पाऊस झाला तरी जुन्या पुलावरून पाणी वाहते. परिणामी देशपूर, कुरंजा, देवीपूर या गावाचा वडधा गावासोबतचा संपर्क तुटतो. वडधा हे गाव या परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी असून येथे शाळा, महाविद्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. तसेच इतर छोटमोठे कार्यालय आहेत. त्यामुळे देशपूर, कुरंजा, देवीपूर व इतर गावातील नागरिक वडधा येथे दररोज कामानिमित्त ये-जा करीत असतात. वडधा येथे बाजारपेठ आहे. त्यामुळे जीवनापयोगी तसेच संसारपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी अनेक महिला व पुरूष वडधा येथे जात असतात. मात्र रस्ता व पुलाची दुर्दशा झाल्याने धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर वाहने सुद्धा भंगार झाली आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक