शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरधारकांचे कामबंद आंदोलन सुरू

By admin | Updated: July 23, 2015 01:22 IST

महाराष्ट्र शासनाने अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नुकताच एक नवीन निर्णय घेतला आहे.

शासन निर्णयाच्या विरोधात : अहेरी, आलापल्लीत ट्रॅक्टर उभे
अहेरी : महाराष्ट्र शासनाने अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नुकताच एक नवीन निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ट्रॅक्टरचालकांवर विविध निर्बंध लादून देण्यात आले आहे. शासनाच्या या एकतर्फी निर्णयाच्या विरोधात अहेरी व आलापल्ली भागातील संपूर्ण ट्रॅक्टर मालक, चालक व मजुरांनी रोष व्यक्त केला असून गेल्या तीन दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे अहेरीत पोलीस ठाण्याच्या मार्गावर मोकळ्या जागेत ट्रॅक्टर तसेच ट्रॉल्या उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात कोणतेही उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी कर्ज काढून ट्रॅक्टर खरेदी केल्या आहेत. या ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेती वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. परिणामी याच व्यवसायावर ट्रॅक्टर मालक, चालक व मजुरांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. अहेरी व आलापल्ली भागात गेल्या काही दिवसांपासून विविध शासकीय इमारतीचे तसेच खासगी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या इमारत बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात रेतीची आवश्यकता भासते. ट्रॅक्टरने रेती पुरविण्याचे काम ट्रॅक्टर मालक, चालक व मजुरांमार्फत सुरू होते. दरम्यान महाराष्ट्र शासनाने नवा शासन निर्णय निर्गमित करून अवैध रेती उत्खनन वाहतुकी संदर्भात ट्रॅक्टरचालकांवर जाचक निर्बंध लादले आहेत. अशा परिस्थितीत रेती वाहतुकीचा व्यवसाय करणे, कठीण झाले आहे. त्यामुळे अहेरी व आलापल्ली भागातील संतप्त ट्रॅक्टर मालक व चालकांनी गेल्या तीन दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. शासन जोपर्यंत नव्या निर्णयात बदल करून अवैध रेती वाहतुकीबाबतच्या जाचक अटी शिथील करणार नाही, तोपर्यंत व्यवसाय करणार नाही, असा इशारा ट्रॅक्टर चालक व मालकांनी दिला आहे. रेतीची वाहतूक बंद झाल्याने बांधकामावर परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)
बांधकामावर परिणाम
अवैध रेती वाहतुकीच्या कारवाईबाबत राज्य शासनाने ट्रॅक्टरचालकांवर जाचक अटी लादल्या आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ अहेरी व आलापल्ली भागातील ट्रॅक्टरधारकांनी आपल्या ट्रॅक्टर व ट्रॉली मोकळ्या जागेत उभ्या करून रेती वाहतुकीचा व्यवसाय बंद केला आहे. त्यामुळे शासकीय तसेच खासगी बांधकामासाठी रेती मिळणे आता कठीण झाले आहे.
या आहेत जाचक अटी
राज्य शासनाच्या नव्या निर्णयानुसार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रेतीच्या अवैध वाहतूक प्रकरणी संबंधित ट्रॅक्टरचालकावर दंड आकारण्यात येणार आहे.
तोच ट्रॅक्टरचालक दुसऱ्यांदा रेतीची अवैध वाहतूक करताना आढळल्यास संबंधित ट्रॅक्टरचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
तसेच रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सदर ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात येणार आहे.
दोन ते तीनदा रेतीची अवैध वाहतूक करताना आढळून आल्यास संबंधित ट्रॅक्टरचालकाला यापुढे आपण रेतीची अवैध वाहतूक करणार नाही, असे शपथपत्र स्वत:च्या स्वाक्षरीनिशी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना लिहून द्यावे लागणार आहे.