शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दुकानातून तंबाखू होणार गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तंबाखू, खर्रा, नस, गुडाखू सिगारेट, बिडी यासारखे तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर राज्यासह जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीर गडचिरोली किराणा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिलीप सारडा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. या बैठकीला शहरातील किराणा व्यापारी उपस्थित होते. सोबतच मुक्तिपथ संचालक डॉ. मयूर गुप्ता, तालुका संघटक अमोल वाकुडकर व उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.

ठळक मुद्देकोरोना रोखण्यासाठी उपाययोजना : किराणा व्यापारी असोसिएशन गडचिरोलीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व कोरोना संसर्गाचा प्रसार हा निकटचा संबंध आहे. हा सहसंबंध तोडण्यासाठी किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गडचिरोली किराणा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व संमतीने घेतला.कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तंबाखू, खर्रा, नस, गुडाखू सिगारेट, बिडी यासारखे तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर राज्यासह जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीर गडचिरोली किराणा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिलीप सारडा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. या बैठकीला शहरातील किराणा व्यापारी उपस्थित होते. सोबतच मुक्तिपथ संचालक डॉ. मयूर गुप्ता, तालुका संघटक अमोल वाकुडकर व उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.कोरोना संसर्गाचा धोका तालुक्यात व जिल्ह्यात पसरू नये यासाठी प्रशासनाच्या आवश्यक त्या सूचनांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जिल्हा प्रशासनाने तंबाखूजन्य पदार्थाची विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी लक्षात घेत शहरातील किराणा दुकानांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ विकणार नसल्याचा निर्णय असोसिएशने यावेळी जाहीर केला. विक्री करणाऱ्या दुकानदारास असोसिएशन कुठलीही मदत करणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले.डॉ. मयूर गुप्ता म्हणाले, कोरोनाचे संकट जिल्ह्यात वेगाने पसरत आहे. अशा वेळी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी असोसिएशनने घेतलेला हा निर्णय कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी तसेच लोकांचे आरोग्य राखण्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. जास्तीत जास्त दुकानांना यात सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी असोसिएशनला यावेळी केले.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी