शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटी आठ लाखांचे धान चुकारे थकले

By admin | Updated: July 23, 2015 01:25 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीमार्फत आधारभूत खरेदी योजनेंतर्गत विविध कार्यकारी सहकारी संस्थेने एकूण ५६ धान खरेदी केंद्रावरून ...

लोकमत
विशेष

शासनाकडून निधी नाही : शेतकरी आर्थिक अडचणीत
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीमार्फत आधारभूत खरेदी योजनेंतर्गत विविध कार्यकारी सहकारी संस्थेने एकूण ५६ धान खरेदी केंद्रावरून आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण ४७ कोटी २२ लाख ९४ हजार रूपयांची धान खरेदी केली. यापैकी ४४ कोटी १४ लाख ३३ हजार रूपये अदा करण्यात आले तर गेल्या दोन महिन्यांपासून ३ कोटी ८ लाख ६० हजार ९४२ रूपयांचे धान चुकारे थकले आहे. यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकरी अडचणीत आले आहेत.
आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयामार्फत आधारभूत खरेदी योजनेंतर्गत एकूण ५६ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावरून विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी एकूण ३ लाख ४७ हजार २०७ क्विंटल धान्य खरेदी केली. मात्र अद्यापही ३ कोटी ८ लाख ६० हजार ९४२ रूपयांचे धान चुकारे थकीत आहेत. सदर धान चुकाऱ्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयामार्फत २०१४-१५ च्या हंगामात १ नोव्हेंबर २०१४ पासून धान खरेदीला सुरुवात करण्यात आली. ३० जून २०१५ पर्यंत धान खरेदीचा सदर हंगाम चालला. आता महामंडळाच्या वतीने धान खरेदी बंद करण्यात आली आहे.
कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत वडेगाव, आंधळी, कढोली, गोठणगाव, सोनसरी, गेवर्धा, पळसगड, देऊळगाव, घाटी व कुरखेडा आदी सहकारी संस्थांनी आठ महिन्याच्या कालावधीत एकूण ११ कोटी ६८ लाख ७९ हजार ५५६ रूपयाच्या किंमतीचे एकूण ८५ हजार ८७२ क्विंटल धान खरेदी केली. कुरखेडा कार्यालयामार्फत करण्यात आलेले धान खरेदीचे ९५ लाख २४ हजार ३६५ रूपयांचे चुकारे थकीत आहे. कोरची उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत १५ सहकारी संस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या धान खरेदीचे १ कोटी ५९ लाख ६०३, आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत संस्थांनी खरेदी केलेल्या धानाचे ६ लाख ५२ हजार ४७३, धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत संस्थांनी खरेदी केलेल्या धानाचे १६ लाख ३४८ रूपयांचे चुकारे थकीत आहे. तसेच घोट उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत आठ संस्थांनी खरेदी केलेल्या धानाचे ३१ लाख ८ हजार २० रूपयांचे धानाचे चुकारे थकीत आहे. थकीत चुकाऱ्याची रक्कम द्यावी, अशी मागणी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
असा जातो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसा
आधारभूत खरेदी योजनेंतर्गत आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयाला धान खरेदी करण्याचा अधिकार शासनाने दिला आहे. धान चुकाऱ्याचा निधी राज्य शासन आदिवासी विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक कार्यालयाला अदा करते. सदर कार्यालयातून सर्व जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत पैसा पाठविला जातो. त्यानंतर जिल्हा बँकेची मुख्य शाखा आपल्या इतर शाखांकडे पैसा वर्ग करते. तालुका व मोठ्या गावातील सहकारी बँकेची शाखा धानाची विक्री केलेल्या संबंधित शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यात धान चुकाऱ्याची रक्कम वर्ग करते. त्यानंतर शेतकरी आपल्या बँक खात्यातून धान चुकाऱ्याची रक्कम वटवित असतो.