चितळाची शिकार करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:59 IST2021-01-08T05:59:09+5:302021-01-08T05:59:09+5:30

आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील आलापल्ली पासून १२ किमी अंतरवर असलेल्या मोसम गावातील महेश गंगाराम पोरतेट यांच्या घरी जाऊन पाहणी केली ...

Three Chital hunters arrested | चितळाची शिकार करणाऱ्या तिघांना अटक

चितळाची शिकार करणाऱ्या तिघांना अटक

आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील आलापल्ली पासून १२ किमी अंतरवर असलेल्या मोसम गावातील महेश गंगाराम पोरतेट यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता, चितळाला कापत असल्याचे आढळून आले. पाेरतेट याच्यासाेबत रमेश मल्ला कुळमेथे रा. मोसम व संजय किष्टय्या वेलादी रा. कमलापूर हे सुद्धा आढळून आले. त्यांचा या घटनेत सहभाग असल्याचे दिसून आल्याने तिघांनाही अटक करण्यात आली. चितळाचे डोके, पाय, मांस व कापण्याकरिता वापरण्यात आलेली अवजारे कुऱ्हाड, वासला, कोयता आणि सुरा आदी हत्यार ताब्यात घेण्यात आले.

त्यांची अधिक चौकशी केली असता, मोसम नियतक्षेत्रातील खंड क्रमांक ६४९ ला लागून असलेल्या महेश गंगाराम पोरतेट यांच्या शेतीच्या कुंपणाला लोखंडी अर्थिंग तारेचे फासे लावण्यात आले होते. त्यामध्ये चितळ ठार झाला. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी सी. वाय. ताेंबर्लावार, एन. वडेट्टीवार, के. आर. परचाकी ,एस एम धात्रक, डी एस गजबे, पी. यू. गेडाम, अल्विन उप्पल, पी एम नंदगिरीवार, एन ए मादेशी, एच जी कुमरे, डी डी मलगाम, रसिका मडावी, साधना आत्राम, किरण आत्राम यांच्या पथकाने ही कारवाई केली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या गुन्ह्यातील रमेश मल्ला कुळमेथे याच्याविराेधात यापूर्वीही वनगुन्हा दाखल आहे.

Web Title: Three Chital hunters arrested