चामोर्शी बाजार समितीत हजारो पोते धान भिजले

By Admin | Updated: January 20, 2016 02:55 IST2016-01-20T02:55:02+5:302016-01-20T02:55:02+5:30

मंगळवारच्या पहाटे अचानक झालेल्या पावसाने चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात ठेवण्यात आलेले

Thousands of grandsons were burnt to the Chamorshi Market Committee | चामोर्शी बाजार समितीत हजारो पोते धान भिजले

चामोर्शी बाजार समितीत हजारो पोते धान भिजले

चामोर्शी : मंगळवारच्या पहाटे अचानक झालेल्या पावसाने चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात ठेवण्यात आलेले शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे हजारो पोते धान भिजले. त्यामुळे दोघांनाही प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.
चामोर्शी बाजार समिती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असून संपूर्ण तालुक्यातून व बाहेर तालुक्यातूनही शेतकरी येथे धान विक्रीसाठी आणतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धान खरेदी झाली आहे. गोदाम तुडूंब भरले असल्याने बऱ्याच शेतकरी व व्यापाऱ्यांचे माल उघड्यावर ठेवण्यात आला होता. मंगळवारी पहाटे पाऊस झाल्याने हजारो पोते धान भिजले. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी बाजार समितीला भेट देऊन या सर्व परिस्थितीची पाहणी केली. तारण व शेतकऱ्यांच्या धानाची २० हजार पोते गोदामात आहेत. तसेच २५ दलालांकडे २५ हजार पोती गोदामात आहेत. जवळपास ५० हजार पोती मावेल एवढी क्षमता गोदामाची आहे. ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे दररोज खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या धानाला गोदामा जागा नसल्याने ते उघड्यावर आहे. अनपेक्षीत आलेल्या पावसाने धान भिजले व नुकसान झाले. याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Thousands of grandsons were burnt to the Chamorshi Market Committee