शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

हलबा जमातीच्या प्रश्नांवर विचारमंथन

By admin | Updated: July 13, 2015 01:49 IST

राष्ट्रीय हलबा जमात महामंडळ व हलबा जमात संघटना गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी येथील...

गडचिरोलीत राष्ट्रीय परिषद : आदिवासी हलबा आरक्षणावरही झाली चर्चा
गडचिरोली : राष्ट्रीय हलबा जमात महामंडळ व हलबा जमात संघटना गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित सत्यशोधक आदिवासी हलबा आरक्षण परिषदेत हलबा जमातीच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले. हलबा जमातीला आरक्षण व हक्क मिळण्यासाठी संघटितरीत्या एकत्रित येऊन शासनाच्या विरोधात लढा उभारण्याचा एकमुखी निर्णय या परिषदेत घेण्यात आला.
हलबा जमातीच्या राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी बी. के. हेडाऊ होते. यावेळी उदय धकाते, राकेश कुंभारे, अभयकुमार धकाते, डॉ. सुशील कोहाड, राकेश देविकर, गजानन सोरते, प्रशांत सिलेकर, सूरज कवाडघरे, दीपक बोकडे, मनोहर धकाते, रवींद्र निमजे, महादेव कुंभारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
देशात वास्तव्यास असलेल्या आदिवासी हलबा जमातीला महाराष्ट्र शासन सापत्न वागणूक देत आहे. या जमातीस शासन अस्पृश्य समजून जात पडताळणीच्या माध्यमातून वाळीत टाकले जात आहे. यामुळे हलबा जमातीचे लोक पूर्णपणे खचले आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या विरोधात तीव्र लढा उभारण्यासाठी रणनिती आखणे गरजेचे आहे. त्यासाठीच या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन परिषदेचे अध्यक्ष बी. के. हेडाऊ यांनी केले. या परिषदेचे प्रास्ताविक हलबा जमात महामंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, संचालन रूपराम निमजे यांनी केले तर आभार राकेश देविकर यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
हे झाले सर्वानुमते निर्णय
हलबा समाजाच्या महाराष्ट्रातील आमदारांनी वर्षातून एकदा समाजाची तसेच सर्व समाज संघटनांची एकत्रित बैठक घ्यावी, सदर आमदारावर समाजाच्या हक्कासाठी महामंडळाने दबावगट निर्माण करावा, हलबा जमातीचा अभ्यासगट निर्माण करावा, हलबा जमातीतील कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाजविरोधी कार्य केल्यास त्यांना सामाजिक कार्यापासून दूर करणे, समाजाच्या प्रश्नावर मोर्चा, उपोषण व आंदोलन करणे, आदी निर्णय परिषदेत घेण्यात आले.