शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीशिवाय वीज जोडणीचे प्रमाणपत्र नाही

By admin | Updated: January 23, 2016 01:33 IST

जे नागरिक घर बांधकामाची नगर परिषदेकडून परवानगी घेत नाही, अशा नागरिकांना वीज जोडणीसाठी परवानगी द्यायची नाही, ...

नगर परिषद प्रशासनाचा निर्णय : दोन महिन्यात ५० वर प्रस्ताव प्रलंबितगडचिरोली : जे नागरिक घर बांधकामाची नगर परिषदेकडून परवानगी घेत नाही, अशा नागरिकांना वीज जोडणीसाठी परवानगी द्यायची नाही, असा निर्णय प्रशासनाने घेत याची कडक अंमलबजावणी सुरू झाली असल्याने मागील चार महिन्यात ५० पेक्षा अधिक अर्ज नगर परिषदेच्या कार्यालयात पडून आहेत. त्यामुळे परवानगी न घेता बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नियमानुसार नगर परिषद क्षेत्रात घराचे बांधकाम करण्याच्या पूर्वी नगर परिषदेकडे रितसर परवानगी मागणे आवश्यक आहे. नगर परिषदेकडे परवानगी मागितल्यानंतर नगर परिषद प्रशासन संबंधित व्यक्तीला घर बांधकामाची परवानगी देताना कर आकारते. या माध्यमातून नगर परिषदेला उत्पन्न प्राप्त होते. मात्र काही नागरिक कराचे पैसे वाचविण्यासाठी नगर परिषदेची परवानगी न घेताच घराचे बांधकाम करीत आहेत. यामुळे दरवर्षी नगर परिषदेला लाखो रूपयांच्या करावर पाणी सोडावे लागत आहे. त्याचबरोबर काही नागरिक नियमानुसार घर बांधकाम सुध्दा करीत नाही. परिणामी भविष्यात नगर परिषदेलाच अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नगर परिषद प्रशासनाने जे नागरिक घर बांधकामाची परवानगी मागणार नाही, त्यांना वीज जोडणीचे नाहरकत प्रमाणपत्रच द्यायचे नाही, असा निर्णय घेतला आहे व याची कडक अंमलबजावणी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मागील चार महिन्यांत जवळपास ३०० नागरिकांनी वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. त्यातील ५० नागरिकांनी घर बांधकामाची परवानगीच न घेतल्याचे आढळून आले आहे. त्यांना वीज जोडणीसाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे परवानगी न घेता अवैध बांधकाम करणाऱ्यांची गोची झाली आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)गडचिरोली शहरातील जुन्या वस्तीत २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीची घरे आहेत. अशा घरांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे. अशा घरांसाठी वीज जोडणी आवश्यक असल्यास त्यांना परवानगी दिली जात आहे. मात्र मागील दोन वर्षात ज्या नागरिकांनी परवानगी न घेता बांधकाम केले आहे, त्यांना वीज जोडणी नाहरकत प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. नगर परिषदेच्या या निर्णयामुळे परवानगी न घेता घराचे बांधकाम करणाऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र याचा एक सकारात्मक परिणाम म्हजणे, प्रत्येकच नागरिक परवानगी घेऊन बांधकाम करणार आहे.