शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

गोठा बांधकाम होऊनही अनुदानाचे वितरण नाही

By admin | Updated: August 26, 2016 01:17 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून गोठा बांधकाम पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यास ५१ हजार रूपयांचा धनादेश संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती

दोन महिने उलटले : खरपुंडीच्या शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून गोठा बांधकाम पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यास ५१ हजार रूपयांचा धनादेश संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती गडचिरोली यांच्याकडून वितरित करण्यात आला नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कार्यवाही झाली नसल्याचे खरपुंडी येथील शेतकरी नारायण मुका भुरसे यांनी म्हटले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वार्षिक नियोजन यथार्थदर्शी आराखड्यात समाविष्ट केलेल्या कामात गुरांच्या गोठ्यांचे बांधकाम करायचे होते. गडचिरोली पंचायत समितीअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना हे काम करण्याचे आदेश १५ डिसेंबर २०१४ ला देण्यात आले. त्यानुसार काम पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना काम झाल्यानंतर सदर पूर्ण कामाचे छायाचित्र काढून सदर कामाच्या खर्चाचे बिल पंचायत समितीकडे सादर करायचे होते. त्यानुसार खरपुंडी येथील नारायण मुका भुरसे या शेतकऱ्याने सर्व बिल व काम पूर्ण झाल्याचे छायाचित्र पंचायत समितीकडे सादर केले.मात्र दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटूनही संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वितरित करावयाच्या धनादेशावर सह्या न केल्याने शेतकऱ्याला ५१ हजारांचा धनादेश मिळू शकलेला नाही. याबाबत शेतकऱ्याने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे ७ जून २०१६ रितसर तक्रारही केली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून तक्रारीवर काहीही कारवाई झाली नाही, अशी माहिती भुरसे यांनी लोकमतला दिली.