शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी गावाचे सहकार्य गरजेचे

By admin | Updated: April 10, 2017 01:02 IST

गावात दारूबंदी, व्यसनमुक्ती राबविण्यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय पोलीस काहीच करू शकत नाही,

 महेश पाटील यांचे प्रतिपादन : वैरागड येथे दारूबंदीचा ठराव पारितवैरागड : गावात दारूबंदी, व्यसनमुक्ती राबविण्यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय पोलीस काहीच करू शकत नाही, असे प्रतिपादन आरमोरीचे पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी केले. दारू, सट्टा, जुगाराचे प्रमाण वाढत चालले आहे. याला आळा बसावा यासाठी महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या वतीने समाज मंदिरात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला तंमुचे सदस्य, गावकरी उपस्थित होते. अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नोटीस बजावून या सभेला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र हजर झाले नाही. या सभेदरम्यान गावात दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. बैठकीला वैरागडच्या सरपंच गौरी सोमनानी, उपसरपंच श्रीराम अहीरकर, तंमुस अध्यक्ष जगदिश पेंदाम, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, परसराम कुंभरे, डोनूजी कांबळे, संगीता मेश्राम, दिनकर लोथे, नलिनी आत्राम, जनबाई सोनवाने, सरीता धनकर, मंजुळा खोब्रागडे, मुक्तीपथचे संघटक पितांबर सुपारे, अल्का मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना महेश पाटील म्हणाले, अवैध दारू विक्रेत्यांना पोलिसांनी पकडल्यानंतर कायदेशीर कारवाई होण्यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. अनेक साक्षीदार कोर्टात आपली साक्ष बदलवून टाकतात. त्यामुळे दारू विक्रेते मुक्त होता. सामाजिक सुरक्षा व स्वास्थ बिघडविणाऱ्या या व्यक्तींना सजा होत नाही. त्यांची आणखी हिंमत वाढून अवैध धद्यांना ऊत येते. पकडलेले दारू विक्रेते मोकाट सुटत असल्याने शेवटी पोलीसही निराश होतात. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दारू विक्रेत्यांना अद्दल घडविणे आवश्यक आहे. या सर्व कामात पोलिसांबरोबरच गावकऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले.