शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पाेलीस भरतीच्या युवकांनी फुलले गडचिराेली शहरातील मुख्य रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2022 05:00 IST

गडचिराेली शहरात येणाऱ्या धानाेरा, चामाेर्शी, आरमाेरी मार्गाने दुचाकी व चारचाकी वाहनांची रांग लागल्याचे दिसून येत हाेते. तब्बल ४ वर्षांनंतर पोलीस भरती होत असल्यामुळे अनेक उमेदवारांनी अर्ज केले हाेते. एका जागेसाठी जवळपास १२५ जण या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्यामुळे त्यांची सुरळीतपणे परीक्षा घेण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे हाेते. ही परीक्षा शांततेत पार पडली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या १३६ जागांसाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. भरतीसाठी जिल्ह्यातील १६ हजार ८४८ युवक-युवतींनी अर्ज केला हाेता. यातील बहुतांश परीक्षार्थिंनी हजेरी लावली. ही परीक्षा गडचिराेली व सभाेवतालच्या केंद्रांवर घेण्यात आली. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते युवकांच्या गर्दीने फुलून गेले हाेते. या परीक्षेसाठी जिल्ह्यातीलच युवक असल्याने फार कमी युवक आदल्या दिवशी मुक्कामास आले हाेते. परीक्षेच्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच युवक गडचिराेली शहरात दाखल हाेण्यास सुरुवात झाली. गडचिराेली शहरात येणाऱ्या धानाेरा, चामाेर्शी, आरमाेरी मार्गाने दुचाकी व चारचाकी वाहनांची रांग लागल्याचे दिसून येत हाेते. तब्बल ४ वर्षांनंतर पोलीस भरती होत असल्यामुळे अनेक उमेदवारांनी अर्ज केले हाेते. एका जागेसाठी जवळपास १२५ जण या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्यामुळे त्यांची सुरळीतपणे परीक्षा घेण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे हाेते. परीक्षा केंद्रावर कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी विविध ठाण्यांमधील पोलीस, राखीव पोलीस आणि होमगार्ड मिळून १६ केंद्रांवर जवळपास २ हजार अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले हाेते. आता युवकांचे लक्ष निकालाकडे राहणार आहे. पाेलीस भरती प्रक्रिया जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, अपर पाेलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पाेलीस अधीक्षक (अभियान) साेमय मुंडे, अहेरीचे अपर पाेलीस अधीक्ष अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडली.

दीड तास ट्राफिक जाम -    चारही बाजूने येणाऱ्या युवकांची चारचाकी व दुचाकी वाहने इंदिरा गांधी चाैकातूनच जात असल्याने या चाैकात जवळपास दीड तास ट्राफिक जाम झाली हाेती. चारही मार्गांवर वाहनांची माेठी रांग लागली हाेती. रविवारी आठवडी बाजार असल्याने गर्दीत आणखी भर पडली. काही युवक शहरातील आतमधील गल्ल्यांमधून दुचाकी वाहने टाकून मार्ग काढत हाेते. 

शांततेत पार पडली परीक्षा परीक्षेची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे दाेन हजार पाेलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. ही परीक्षा शांततेत पार पडली.

 

टॅग्स :Policeपोलिसexamपरीक्षा