शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
4
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
5
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
6
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
7
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
8
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
9
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
10
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
11
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
12
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
13
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
14
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
15
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
16
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
17
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
18
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
20
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता संकलनाकडे कंत्राटदारांनी फिरविली पाठ

By admin | Updated: March 12, 2015 02:03 IST

जिल्ह्यातील एकूण ४३ युनिटमधून तेंदूपत्ता संकलनासाठी वन विभागाने लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र लिलावाची तिसरी फेरी...

गडचिरोली : जिल्ह्यातील एकूण ४३ युनिटमधून तेंदूपत्ता संकलनासाठी वन विभागाने लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र लिलावाची तिसरी फेरी आटोपूनही केवळ सहा युनिटचा लिलाव झाला आहे. तेंदूपत्ता संकलनाचा कालावधी जवळ येत असतानाही विक्री न झाल्याने तेंदूपत्ता संकलन अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आदी राज्यांमधील व्यापारी गडचिरोली येथे येऊन तेंदूपत्ता खरेदी करतात. तेंदूपत्त्याच्या माध्यमातून गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, छत्तीसगड व तेलंगणा राज्यातील नागरिकांना रोजगार प्राप्त होतो. पेसा कायद्यातून वगळलेल्या गावांमध्ये वन विभागाच्यामार्फतीने तेंदूपत्ता संकलन करण्यात येते. अशा प्रकारचे ४३ युनिट आहेत. या युनिटमध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे वन विभागाने यावर्षीही तेंदू युनिट विक्रीसाठी लिलाव प्रक्रिया राबविली होती. लिलावाच्या तीन फेऱ्यांमध्ये कर्कापल्ली, सावेला, लवेझरी, मुरमुरी व आरमोरी या सहा युनिटची विक्री झाली आहे. उर्वरित ३७ युनिटला वन विभागाच्या नियमांप्रमाणे किंमत प्राप्त झाली नाही. त्यामुळे या युनिटचा लिलाव रखडला आहे. लिलावासाठी चवथी फेरी राबवायची किंवा नाही. त्याचबरोबर कंत्राटदारांनी बोली लावलेल्या किंमतीला युनिट द्यायचे की नाही, याबाबत फेरविचार करण्यासाठी शासनाकडून निर्देश मागविले जाणार आहेत. यावर्षी पहिल्यांदाच तेंदूपत्ता युनिट विक्रीला कंत्राटदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने वन विभागाचे कर्मचारी सुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तेंदूपत्ता संकलनाला एप्रिल महिन्याच्या शेवटपासून सुरुवात होते. तेंदूपत्त्याचा युनिट खरेदी केल्यानंतर कंत्राटदारांकडून तेंदूपत्ता जास्त यावा, यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातात. मात्र मार्च महिन्याला सुरुवात होऊनही तेंदूपत्ता युनिटची विक्री झाली नाही. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तेंदूपत्ता युनिट विक्रीस जसजसा विलंब होईल, तसतशी किंमत कमी येईल, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे तेंदूपत्ता संकलनाच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. (नगर प्रतिनिधी)