शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिक्की तपासण्यासाठी अन्न व औषध विभागाचे पथक अहेरीत दाखल

By admin | Updated: July 15, 2015 01:38 IST

तालुक्यातील अंगणवाड्यांना पुरविण्यात आलेल्या चिक्कीच्या पुड्यावर घटक पदार्थ शेंगदाना असे लिहिले असून त्यामध्ये मात्र राजगिराची चिक्की आढळली.

दणका लोकमतचा
अंगणवाड्यांची तपासणी : शासनाला अहवाल पाठविणार

अहेरी : तालुक्यातील अंगणवाड्यांना पुरविण्यात आलेल्या चिक्कीच्या पुड्यावर घटक पदार्थ शेंगदाना असे लिहिले असून त्यामध्ये मात्र राजगिराची चिक्की आढळली. त्याचबरोबर सदर पॉकेटवर पॅकींगची तारीख नसल्याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये सोमवारी प्रकाशित होताच अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक मंगळवारी अहेरीत दाखल झाले व त्यांनी अंगणवाड्यांमधील चिक्कीची तपासणी केली.
सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने अंगणवाडीतील बालकांना खाद्य पदार्थ म्हणून शेंगदाना व राजगिराची चिक्की पुरविण्याचा निर्णय घेतला. अहेरी येथील अंगणवाड्यांना सुर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित वेंगुर्ला जि. सिंधूदुर्ग या उत्पादक कंपनीकडून मालाचा पुरवठा केला जात होता. मात्र बहुतांश पुड्यांवर घटक पदार्थ म्हणून शेंगदाना असे लिहिण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र पुड्याच्या आतमध्ये राजगिरा असल्याचे दिसून आले. तसेच सदर पुड्यावर पॅकींग केल्याचा दिनांक, बॅच क्रमांक, वजन याबद्दलचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे काही पालकांमध्ये या चिक्कीबद्दल संशय निर्माण होऊन त्यांनी याबाबत लोकमतच्या प्रतिनिधीकडे तक्रार केली. याबाबतचे वृत्त सोमवारी लोकमतच्या प्रादेशिक पानावर प्रसिध्द झाले. सदर वृत्त वाचल्यानंतर बालकल्याण तसेच अन्न व पुरवठा विभाग खळबळून जागा झाला. आयुक्तांनी चौकशीचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले. गडचिरोली येथील अन्न सुरक्षा अधिकारी चहांदे यांच्यासह दोन अधिकारी मंगळवारी अहेरी येथे दाखल झाले. त्यांनी जिल्हा परिषद शाळेजवळ असलेली अंगणवाडी, धरमपूर येथील अंगणवाडी तसेच इतर अंगणवाड्यांचीही तपासणी केली. मात्र अंगणवाडी सेविकांनी सदर पॉकेट बालकांना वितरित केले असल्याने त्याचे नमुने आढळून आले नाही. त्याचबरोबर अहेरी बाल विकास प्रकल्प अधिकारी आर. डी. मेश्राम या जिमलगट्टा येथे गेल्या असल्याने त्यांचीही भेट होऊ शकली नाही. याबाबतची माहिती मेश्राम यांनी अन्न व औषध विभागाला गडचिरोली येथे येऊन द्यावी, अशी सूचना करून पथकातील अधिकारी गडचिरोली येथे परतले. (शहर प्रतिनिधी)