शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

टॅटूमुळे युवकांचे सैन्य दलातील स्वप्न भंगले

By admin | Updated: January 23, 2016 01:35 IST

सैन्यदलातर्फे भंडारा येथे गडचिरोली व गोंदिया दोन जिल्ह्यातील युवकांसाठी सैन्य भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली.

फॅशन मुळावर : गोंदण असणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाददेसाईगंज : सैन्यदलातर्फे भंडारा येथे गडचिरोली व गोंदिया दोन जिल्ह्यातील युवकांसाठी सैन्य भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. यात देसाईगंज तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनेक युवक सहभागी झाले. मात्र बहुतांश युवकांच्या शरीरावर गोंदण (टॅटू) असल्याने या तरूणांना सैन्य भरतीच्या प्राथमिक चाचणीतच बाद करण्यात आले. परिणामी टॅटूमुळे जिल्ह्यातील अनेक युवकांचे सैन्यदलात जाण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. सैन्य भरतीत पात्र होण्यासाठी युवकांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे गोंदण, चिन्ह व टॅटू नसावे, असा नियम आहे. मात्र आधुनिक फॅशनच्या युगात अनेक युवकांनी शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी टॅटू निर्माण केले आहे. यामुळे चपळ व धष्टपूस्ट शरीरयष्टी असतानासुध्दा अनेक युवकांना सैन्य भरतीपासून बाद व्हावे लागले. टीव्ही सिनेमाचे अनुकरण करताना इतरांपेक्षा काहीतरी वेगळे दिसण्याच्या नादात अनेक युवक स्वत:च्या शरीरावर विविध ठिकाणी टॅटू काढले आहे. शत्रू पक्षात आपली कोणत्याही प्रकारची ओळख निर्माण होऊन यासाठी शरीरावर चिन्ह, टॅटू, गोंदण नसावे, असा लष्करभरतीचा नियम आहे. शरीरावर टॅटू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनामुळे टॅटू नेहमीकरिता शरीरावर कायम राहते. व्यायाम शाळेत जाऊन अनेक युवकांनी धष्टपूष्ट शरीरयष्टी कमावली व भंडारा येथील सैन्य भरती प्रक्रियेत सहभागी झाले. मात्र जवळपास १२ युवकांच्या शरीरावर टॅटू असल्यामुळे त्यांना भरतीच्या प्राथमिक चाचणीतच बाद करण्यात आले. त्यामुळे पुढील चाचणीपूर्वीच या युवकांना परतीचा प्रवास करून गावाला पोहोचावे लागले. (वार्ताहर)नियमाबाबत अनभिज्ञता; संधी गमावलीभंडारा येथे ६ ते १६ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सैन्य भरतीसाठी आपण गेलो. मात्र आपल्या शरीरावर टॅटू असल्यामुळे प्राथमिक चाचणीतच भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले. सैन्य भरतीच्या या नियमाची आपल्या माहिती नव्हती. फॅशनच्या प्रवाहात वाहत गेल्यामुळे आपल्याला ही सैन्य दलातील नोकरीची संधी गमवावी लागली, असे एका युवकाने अश्रू ढाळत सांगितले.