शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

गावठी आंब्याची लज्जत यावर्षी महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात संकरित आंब्यांच्या फळबागा फार कमी प्रमाणात आहेत. गावठी आंब्याची झाडे आहेत. तसेच काही गावांमध्ये आमराई आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात होताच आबालवृद्धांचे लक्ष आमराईकडे जाते. जानेवारी महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहर येते. मोहरामुळे हिरवे आंब्याचे झाड पिवळे झुंज दिसायला लागतात. मात्र यावर्षी वातावरणात झालेल्या बदलाचा मोठा फटका आंबा व मोहाला बसला.

ठळक मुद्देगारपिटीचा फटका : वातावरणातील बदलामुळे मोहोर झडला, जुन्या आमराया होताहेत नष्ट

विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : फळांचा राजा म्हणून आंब्याच्या फळाची संपूर्ण भारतात ओळख आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी आंब्याच्या झाडांना फार कमी मोहर आला. १५ दिवसांपूर्वी झालेल्या गारपीठमुळे असलेला मोहरही झडून गेला. त्यामुळे आता आंब्याच्या झाडाला फारच कमी कैऱ्या लागल्या आहेत. काही झाडांना तर एकही कैरी दिसत नाही. केवळ हिरवेगार आंब्याचे झाड दिसून येते. आंब्याचे उत्पादन घटणार असल्याने आंब्याचे भाव गगणाला भिडतील. त्यामुळे खवय्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात संकरित आंब्यांच्या फळबागा फार कमी प्रमाणात आहेत. गावठी आंब्याची झाडे आहेत. तसेच काही गावांमध्ये आमराई आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात होताच आबालवृद्धांचे लक्ष आमराईकडे जाते. जानेवारी महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहर येते. मोहरामुळे हिरवे आंब्याचे झाड पिवळे झुंज दिसायला लागतात. मात्र यावर्षी वातावरणात झालेल्या बदलाचा मोठा फटका आंबा व मोहाला बसला. यावर्षी पावसाळ्यात सतत दोन महिने पाऊस पडला. त्यानंतर हिवाळ्यातही अधूनमधून ढगाळ वातावरण राहत असल्याने पाहिजे तशी थंडी पडली नाही. ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या झाडाला मोहर आले नाही. त्यानंतर मार्च महिन्यात दोन ते तीनवेळा गारपीट झाली. गारपीटचा मोठा फटका मोहराला बसला. आंब्याच्या झाडावरील संपूर्ण मोहोर झडला. त्यामुळे आता झाडाला कैºया नाहीत.गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे होती. मात्र शेतीसाठी या झाडांची कत्तल झाली. मात्र काही गावांमध्ये आमराई शिल्लक आहे. नवीन झाडांची लागवड होत असल्याने आमराई नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावठी आंब्याची चव पुढच्या पिढीला चाखायला मिळणे जवळपास कठीण आहे. परिणामी शहरातील बरेचसे लोक आपल्या अंगणात आंब्याचे रोपटे लावतात.आंब्याविना झाली गुढीपाडव्याची पूजागुढीपाडव्याच्या सणाला आंब्याची पूजा करून गुढी उभारली जाते. तसेच या दिवशी विविध कडधान्यांचा उसळ व आंब्याचा पणा किंवा चटणी करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. वयोवृद्ध नागरिक गुढीपाडव्याचा सण झाल्याशिवाय आंबा खात नाही. त्यामुळेच गुढीपाडव्याच्या सणाला आंब्याचे महत्त्व आहे. मात्र यावर्षी कच्चे आंबे बाजारपेठेत आले नाही. त्यामुळे आंब्याच्या फळाविनाच गुढीपाडव्याची पूजा करावी लागली.गुढी पाडव्याच्या दिवशी गडचिरोली शहरात काही मोजके विक्रेते गावठी आंब्याची विक्री करीत होते. मात्र आंब्याचा भाव वधारलेला होता. ४० रुपये पाव या दराने गांधी चौकात आंबे विकली जात होती. शेतकऱ्यांकडूनच आंब्याचे भाव वाढून आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Mangoआंबा