शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

लगाम येथील नळ पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

लगाम येथील जलशुद्धीकरण केंद्रातून लगाम, लगाम चेक, काकरगट्टा, कांचनपूर, चुटुगुंटा, दामपुर, शांतीग्राम, बोरी आदी गावात पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यापासून दर महिन्याला पाईपलाईन फुटते, संबधित कंत्राटदाराने पाईपलाईन निकृष्ट दर्जाची टाकल्याने नेहमीच ही पाईपलाईन फुटत असते.

ठळक मुद्देपाईपलाईन फुटली : पाणीपुरवठा विभाग व कंत्राटदाराच्या बेजाबदारपणामुळे दुरूस्ती रखडली

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने गेल्या आठ दिवसापासून लगाम व लगाम चेक या दोन गावांचा पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.लगाम येथील जलशुद्धीकरण केंद्रातून लगाम, लगाम चेक, काकरगट्टा, कांचनपूर, चुटुगुंटा, दामपुर, शांतीग्राम, बोरी आदी गावात पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यापासून दर महिन्याला पाईपलाईन फुटते, संबधित कंत्राटदाराने पाईपलाईन निकृष्ट दर्जाची टाकल्याने नेहमीच ही पाईपलाईन फुटत असते. प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून सदर बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लगाम येथे पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे व कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे महिन्यातून दोन-तीन दिवस तरी नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. मात्र याकडे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.अहेरी उपविभागाच्या अनेक गावातील सौरऊर्जेवरील नळ पाणीपुरवठा योजना नादुरूस्त स्थितीत असल्याची माहिती आहे.कामगारांचे मानधन प्रलंबितलगाम येथील जलशुद्धीकरण केंद्र व पाणी पुरवठा करण्यासाठी सहा कामगारांची नियुक्ती करण्यात आली. मात्र गेल्या चार महिन्यांपासून संबंधित कंत्राटदाराने मानधन अदा न केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. पगाराअभावी पाईपलाईन दुरुस्तीसाठी त्यांनी अनास्था दाखवली आहे. परिणामी नळ पाईपलाईनची दुरूस्ती रखडली आहे. प्रशासनाने पाणी समस्याची दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात