शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वादोन हजार शौचालय पूर्ण

By admin | Updated: July 21, 2015 02:12 IST

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला २०१५-१६ या वर्षात एकूण २३ हजार ५५७ वैयक्तीक शौचालय

स्वच्छ भारत मिशन : पावसामुळे कामकाज मंदावले
दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला २०१५-१६ या वर्षात एकूण २३ हजार ५५७ वैयक्तीक शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट देण्यात आले. यापैकी आतापर्यंत केवळ २ हजार २५२ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून तब्बल २१ हजार ३१९ शौचालयाचे बांधकाम अपूर्ण आहे. पावसामुळे जिल्ह्यात शौचालयाचे बांधकाम मंदावले असून बांधकामात प्रचंड दिरंगाई होत आहे.
२ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)ची सुरूवात करण्यात आली. या मिशनच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ग्रामीण भागातील संपूर्ण स्वच्छतेचे उद्दीष्ट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनी म्हणजे, सन २०१९ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. सन २०१९ पर्यंत राज्यातील सर्व कुटुंबांच्या घरी शौचालयाची निर्मिती करून सुंदर, स्वच्छ राज्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यातच केंद्र व राज्य शासनाकडून सदर शौचालय बांधकामासाठीचा १२ हजार रूपयाच्या अनुदानाची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली नाही. स्वत: जवळचे पैसे खर्च करून शौचालयाचे बांधकाम करावे लागत आहे.

केंद्र सरकारकडून निधी अप्राप्त
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्गीय लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी केंद्र शासनाकडून नऊ हजार व राज्य शासनाकडून तीन हजार असे एकूण १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. राज्य शासनाकडून चार कोटींचा निधी जिल्हा कोषागार कार्यालयातून बीडीएसवर टाकण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र केंद्र शासनाकडून शौचालय बांधकामाच्या अनुदानाचा निधी अद्यापही प्राप्त झाला नसल्याची माहिती मिळाली आहे.

ग्रा.पं. सदस्यांच्या शौचालय बांधकामाची माहिती नाही
गडचिरोली जिल्ह्यात एप्रिल महिन्यात दोन टप्प्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ४५६ ग्रा.पं.पैकी अनेक ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित बहुतांश ग्रा.पं. सदस्यांकडे शौचालय नसल्याची माहिती आहे. या संदर्भात पंचायत समिती स्तरावरून जिल्हास्तरावरील स्वच्छता मिशन कक्षाने वारंवार माहिती मागितली. मात्र पं.स.स्तरावरून ग्रा.पं. सदस्यांकडे शौचालय असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली नाही. केवळ कोरची पं.स.ने याबाबतची माहिती दिली असून या तालुक्यात सर्वच ग्रा.पं. सदस्यांकडे शौचालय असल्याचे नमूद केले आहे.

भामरागडात बांधकामाचा शुभारंभच नाही
भामरागड तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एकूण ९६० लाभार्थ्यांना शौचालय मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये बीपीएलधारक एसटी लाभार्थ्यांकरिता ५१७, इतर मागास वर्गीयांकरिता १२६९, एपीएलधारक एससी लाभार्थ्यांकरिता ४८६, एसटी लाभार्थ्यांकरिता ५९३ व एक हजार ५१४ अल्पभुधारक शेतकरी लाभार्थ्यांचा समावेश आहे. तसेच मजूर, अपंग व विधवा महिला लाभार्थ्यांना शौचालय मंजूर करण्यात आले आहे. मात्र यापैकी एकाही लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम सुरू केले नाही. परिणामी भामरागड तालुका स्वच्छ भारत मिशनमध्ये माघारला असल्याचे दिसून येत आहे.

गतवर्षी ३० मार्चला मिळाला निधी
गतवर्षी २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यात एकूण १० हजार ६६६ वैयक्तिक शौचालय मंजूर करण्यात आला. या शौचालय बांधकामाच्या अनुदानाचा निधी केंद्र सरकारकडून वर्षाअखेर ३० मार्च २०१५ रोजी मिळाला होता. निधी उशीरा मिळत असल्याने लाभार्थी शौचालय बांधकामाप्रती प्रचंड उदासीन असल्याचे दिसून येते.

तालुकानिहाय शौचालय बांधकामाची स्थिती
तालुकामंजूरपूर्णअपूर्ण
अहेरी२,९७८१८३२,७९५
आरमोरी२,३३६२२३२,११३
चामोर्शी४,९२९९२७४००२
धानोरा१,३७९११०१,२६९
एटापल्ली१,३९५१०३१,२९२
गडचिरोली३,६४०२८५३,३५५
कोरची१,०२९७५९५४
कुरखेडा२,२४९२११२,०३८
मुलचेरा२,२४०८२२,१५८
सिरोंचा४३८५३३८५