शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी २० हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा

By admin | Updated: July 15, 2015 01:43 IST

खरीप हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार ५१० मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे.

पुरेशी उपलब्धता : नऊ हजार मेट्रिक टन खत शिल्लक
गडचिरोली : खरीप हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार ५१० मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. विक्री होऊन गोदामात अजुनही ८ हजार ७३० मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे धानपिकासाठी कोणत्याच खताची कमतरता भासणार नाही, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी खरीप हंगामात केली जाते. यावर्षी सुमारे दोन लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार कृषी विभागाने नियोजन केले असून खत, बियाणे, किटकनाशके यांचा वेळीच पुरवठा होईल, याची खबरदारी घेतली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्याला जवळपास खरीप हंगामात ३७ ते ४० हजार मेट्रिक टन खताची गरज भासते. रब्बी हंगामात खतांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी काही खताची विक्री झाली. ३१ मार्च २०१५ पर्यंत ३ हजार ३६५ मेट्रिक टन खताची विक्री झाली होती. त्यामुळे सदर खत शिल्लक होते. त्याचबरोबर पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर १७ हजार १४४ मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला. दोन्ही मिळून २० हजार ५१० मेट्रिक टन खत खरीप हंगामासाठी उपलब्ध झाले. त्यापैकी ११ हजार ७८० मेट्रिक खताची विक्री झाली असून अजुनही ८ हजार ७३० मेट्रिक टन खत गोदामामध्ये शिल्लक आहे. एकूण मागणीच्या जवळपास ७५ टक्के खत उपलब्ध झाल्याने यावर्षी खताचा तुटवडा जाणवणार नाही, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
संयुक्त खताची मागणी वाढली
गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत मिश्र खतांचा सर्वाधिक वापर केला जात होता. मिश्र खतांचा वाटा एकूण खत वापराच्या सुमारे ५० टक्के एवढा राहत होता. मिश्र खताबरोबरच संयुक्त खत सुध्दा चांगले आहे. याचे महत्त्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पटवून दिल्यानंतर शेतकरी संयुक्त खतांचा वापर करीत आहेत. त्यामुळे त्यांची मागणीही वाढली आहे.