शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उपप्रादेशिक व्यवस्थापकासह तिघेजण कारागृहात

By admin | Updated: August 24, 2016 02:16 IST

धानोरा तालुक्याच्या सावरगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने खरेदी केलेल्या २ हजार १०० क्विंटल धानाची चोरी झाल्याचे ...

सावरगाव धान चोरी प्रकरण : आरोपी न्यायालयीन कोठडीत गडचिरोली : धानोरा तालुक्याच्या सावरगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने खरेदी केलेल्या २ हजार १०० क्विंटल धानाची चोरी झाल्याचे प्रकरण १७ जून २०१६ रोजी उघडकीस आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत असून ते सध्या चंद्रपूरच्या कारागृहात आहेत, अशी माहिती सहायक सरकारी वकील अनिल प्रधान यांनी लोकमतला दिली आहे.न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींमध्ये सावरगाव धान खरेदी केंद्राचे व्यवस्थापक शंकर श्यामराव कुमरे, व्यवसाय प्रतवारीकार हरिदास देवाजी उईके व धानोरा कार्यालयाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बाबाराव लक्ष्मण तरासे यांचा समावेश आहे. सावरगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने सन २०१४-१५ यावर्षात एकूण ९ हजार क्विंटल धानाची खरेदी केली होती. यापैकी २ हजार १०० क्विंटल धान चोरी गेल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाची तक्रार सावरगाव धान खरेदी केंद्राचे व्यवस्थापक शंकर श्यामराव कुमरे यांनी सावरगाव पोलीस मदत केंद्रात दिली. सावरगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर सदर तीन आरोपींना अटक केली होती. विशेष म्हणजे तक्रारकर्ता सावरगाव धान खरेदी केंद्राचा व्यवस्थापक शंकर कुमरे हा या प्रकरणात आरोपी झाला आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रधान यांनी दिली. याप्रकरणातील आरोपी उपप्रादेशिक व्यवस्थापक तरासे याला २१ जून रोजी गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक गांगुर्डे यांनी निलंबित केले होते. यापूर्वी त्यांनी प्रत्यक्ष सावरगाव येथे जाऊन वस्तूस्थिती जाणून घेतली होती. (स्थानिक प्रतिनिधी)देसाईगंज येथील ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिक कैलास अग्रवाल हे आदिवासी विकास महामंडळाच्या धानाची धानोरा उपप्रादेशिक कार्यालयामार्फत दिलेल्या टीपीनुसार वाहतूक करीत होते. सावरगाव येथील धान चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर सावरगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक जगदाडे व त्यांचे सहकारी पोलीस हे अग्रवाल यांच्या घरी दोन ते तीनदा जाऊन चौकशी केली होती. दरम्यान कैलास अग्रवाल व त्यांची पत्नी रिता अग्रवाल यांची चौकशी केली. मात्र त्यांचा या प्रकरणात समावेश असल्याचे आढळून आले नाही. मात्र पोलिसांच्या वारंवार चौकशीमुळे अग्रवाल कुटुंबीय भयभित झाले होते. कैेलास अग्रवाल यांनी गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान सावरगावच्या धान चोरी प्रकरणात अग्रवाल यांचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने रिता अग्रवाल व कैलास अग्रवाल यांना जामीन मंजूर केला, अशी माहिती गडचिरोली न्यायालयाचे सरकारी वकील अनिल प्रधान यांनी लोकमतशी बोलताना दिली.