शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेने विद्यार्थी त्रस्त

By admin | Updated: July 20, 2015 01:45 IST

ंवेबसाईटमध्ये अडचणी : ६५० विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी

लोकमत विशेष
गडचिरोली : सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय मुला, मुलींच्या जिल्ह्यातील पाच शासकीय वसतिगृहात आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर गडचिरोली येथील वसतिगृह तसेच शाळा महाविद्यालयाच्या नावाचा उल्लेख येत नसल्याने आॅनलाईन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी हार्डकॉपी स्वरूपात अर्ज करून प्रवेशाबाबतची नोंदणी करीत आहेत.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया गतवर्षीपासून आॅनलाईन करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागाचे आरमोरी, गडचिरोली, अहेरी, नवेगाव, चामोर्शी आदी सहा ठिकाणी मुलांचे तीन व मुलींचे तीन असे एकूण सहा शासकीय वसतिगृह आहेत. या सहा वसतिगृहाची विघार्थी प्रवेश क्षमता एकूण ५२५ आहे. यापैकी वसतिगृहांमध्ये सध्या गतवर्षीचे ३१४ विद्यार्थी व विद्यार्थिनी दाखल आहेत. सहा वसतिगृह मिळून एकूण २११ जागा रिक्त आहेत. रिक्त असलेल्या या जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया ६ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. प्रवेश नोंदणीकरिता समाज कल्याण विभागाने ँ३३स्र२://ेंँंी२ूँङ्मङ्म’.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल ही वेबसाईट कार्यान्वित केली आहे. सदर वेबसाईट उघडल्यानंतर त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील समाज कल्याणचे वसतिगृह , इयत्ता व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले शाळा महाविद्यालयाच्या नावाचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे प्रवेशासाठी जिल्ह्यातील कोणते वसतिगृह निवडावे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे. ६ जुलै पासून चार ते पाच दिवस समाज कल्याणच्या वेबसाईटवर प्रचंड अडचणी होत्या. त्यामुळे पाच ते सहा दिवस एकाही विद्यार्थ्यांची वसतिगृह प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी झाली नाही. त्यानंतर पुणेच्या समाज कल्याण आयुक्त कार्यालयाने सॉफ्टवेअरमध्ये दुरूस्ती केली. आतापर्यंत पाच वसतिगृहातील २११ रिक्त जागासांठी जवळपास ६५० विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता आॅनलाईन नोंदणी केली आहे. तर पाचही वसतिगृहाच्या अधीक्षकांकडे जवळपास १५० विद्यार्थ्यांचे हार्डकॉपी स्वरूपात प्रवेश अर्ज प्राप्त झाले. (स्थानिक प्रतिनिधी)
जागा रिक्त राहूनही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश नाही
समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ८० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. २० टक्के प्रवेश इतर व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. गतवर्षी २०१४-१५ या सत्रात चामोर्शी मार्गावरील शासकीय वसतिगृहात वर्ग ११ वी विद्यार्थ्यांच्या ११ जागा रिक्त होत्या. या सर्व जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होत्या. प्रवेशाच्या रिक्त जागा राहूनही इतर मागास वर्गीय विद्यार्थ्यांना गतवर्षी या वसतिगृहात प्रवेश देण्यात आला नाही. समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन ओबीसी, एनटी व इतर विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविण्याची गरज आहे.
दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांची ससेहोलपट
जिल्ह्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील अनेक गुणवंत, गरजू व गरीब विद्यार्थ्यांनी शहरातील शाळा महाविद्यालयात प्रवेश घेतले आहेत. या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र समाज कल्याण विभागाकडून वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत प्रचंड दिरंगाई होत असल्याने या विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. नातलग तसेच भाड्याने खोली घेऊन शाळा महाविद्यालयात जावे लागत आहे.