शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी उलगडले गांधीजींचे व्यक्तिमत्त्व

By admin | Updated: October 4, 2014 23:27 IST

अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र मिळवून देण्याबरोबरच जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा प्रयत्न गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी निबंध

गडचिरोली : अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र मिळवून देण्याबरोबरच जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा प्रयत्न गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेदरम्यान केला. गांधीजींच्या जीवनाबद्दलचे विद्यार्थ्यांनी निबंधाच्या माध्यमातून व्यक्त केलेले विचार वाचून मान्यवरही मंत्रमुग्ध झाले. लोकमत बालविकास मंच व गोंडवाना सैनिकी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व, विचार व कार्य या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांचा अ गट व ८ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा ब गट पाडण्यात आले होते. सदर स्पर्धा २ आॅक्टोबर रोजी गोंडवाना सैनिकी विद्यालयात घेण्यात आली. याप्रसंगी उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोेंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडाकर होते. प्रमुख अतिथी म्हणून लोकमत सखी मंचच्या सहसंयोजिका सोनिया बैस, बाल विकास मंचच्या जिल्हा संयोजिका किरण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. निबंध स्पर्धेत अ गटातून प्रथम क्रमांक गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा विद्यार्थी युग उरकुंटवार, द्वितीय क्रमांक कारमेल हायस्कूलचा विद्यार्थी सार्थक संजय खांडरे याने पटकाविला. गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे सुरज वसंत गव्हारे, अथर्व श्रीपदवार, रोहित रामटेके यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. ब गटात प्रथम पारितोषिक गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा साहिल मोगरे, द्वितीय क्रमांक दिव्यानी दिलीप कांबळे यांनी पटकाविला. प्रोत्साहनपर पारितोषिक शिवाजी विद्यालयाचा ओंकार कुटे व गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे शुभम कन्नाके व डेनिस उईके यांनी पटकाविला. प्रथम येणाऱ्यास १ हजार रूपये, द्वितीय येणाऱ्यास ५०० रूपये व प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून १०० रूपये रोख देण्यात आले. संचालन कुळमेथे तर आभार रेचनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उंदीरवाडे यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)