विद्यार्थ्यांची विद्यापीठावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:29+5:30

गोंडवाना विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढ, पुरवणी परीक्षा शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. ‘कुलगुरू हमको पढने दो, देश आगे बढने दो’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’, ‘अवैध शुल्कवाढ मागे घ्या’, अशी घोषणाबाजी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांसह संतप्त विद्यार्थ्यांनी केली. मागील परीक्षांचे निकाल लावताना अनेक विद्यार्थ्यांना काही विशिष्ट विषयात शून्य गुण मिळाले.

Students hit university | विद्यार्थ्यांची विद्यापीठावर धडक

विद्यार्थ्यांची विद्यापीठावर धडक

Next
ठळक मुद्देअभाविपचे आंदोलन : कुलगुरूंशी समस्यांबाबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालय व कॅम्पसमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मंगळवारी स्थानिक गोंडवाना विद्यापीठावर धडक देण्यात आली.
यावेळी अभाविपचे गडचिरोली जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर, विदर्भप्रांत सहमंत्री सुप्रिया सोनटक्के, चंद्रपूर जिल्हा संयोजक प्रवीण गिलबिले, ब्रम्हपुरीचे संयोजक प्रवीण गिरडकर, विद्यार्थिनी प्रमुख रोशनी नागापुरे, जयेश ठाकरे यांच्यासह चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शंभरावर विद्यार्थी उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढ, पुरवणी परीक्षा शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. ‘कुलगुरू हमको पढने दो, देश आगे बढने दो’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’, ‘अवैध शुल्कवाढ मागे घ्या’, अशी घोषणाबाजी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांसह संतप्त विद्यार्थ्यांनी केली. मागील परीक्षांचे निकाल लावताना अनेक विद्यार्थ्यांना काही विशिष्ट विषयात शून्य गुण मिळाले. ही चूक विद्यापीठाची असून घोळ होणार नाही, यासाठी ठोस निर्णय घ्यावा, परीक्षा शुल्कातील वाढ मागे घ्यावी, पुनर्रपरीक्षा शुल्क विषयानुसार घेण्यात यावे, पुनर्रमूल्यांकनाचे निकाल लवकर लावावे, विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची सत्यप्रत देण्यात यावी, कमवा व शिका तसेच विद्यार्थी विमा या योजना सुरू कराव्या, आदी मागण्यांबाबत कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली.

Web Title: Students hit university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.