जंगलाला आग लावणाऱ्यास अटक

By Admin | Updated: April 4, 2017 00:52 IST2017-04-04T00:52:44+5:302017-04-04T00:52:44+5:30

आलापल्ली वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील राखीव जंगलाला आग लावून मौल्यवान संपत्तीचे नुकसान करताना वनाधिकाऱ्यांनी आरोपीला रंगेहात अटक केल्याची घटना रविवारी घडली.

Sticks to the forest fire | जंगलाला आग लावणाऱ्यास अटक

जंगलाला आग लावणाऱ्यास अटक

आलापल्ली वनपरिक्षेत्रातील घटना : वनकायद्यान्वये कारवाई
आलापल्ली : आलापल्ली वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील राखीव जंगलाला आग लावून मौल्यवान संपत्तीचे नुकसान करताना वनाधिकाऱ्यांनी आरोपीला रंगेहात अटक केल्याची घटना रविवारी घडली. सुनील प्रेमानंद बिश्वास (४५) रा. स्कुल परा पी. व्ही. ८६ नेताजी नगर कांकेर कुरेनर जिल्हा छत्तीसगड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी हा सध्या अहेरीच्या तालुक्याच्या पेरमिली येथील रहिवासी आहे. आलापल्ली वनविभागाअंतर्गत आलापल्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ८ मधील राखीव वनामध्ये सुनील प्रेमानंद बिश्वास याने प्रवेश केला. जंगलाला आग लावून मौल्यवान वस्तूंचे नुकसान केले. याप्रकरणी आरोपी सुनील बिश्वास याला वनाधिकाऱ्यांनी अटक केली. आरोपीने वनामध्ये अपप्रवेश करून ज्वलनशील पदार्थ उद्देशपूर्व वनात घेऊन गेला व आग लावण्याचा वन गुन्हा केला.
आरोपी सुनील बिश्वास याच्या विरूद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) (अ) (ड) (फ) तसेच जैवविविधता अधिनियम २००२ चे कलम ५६ नुसार वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास आलापल्लीचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला एन यांच्या मार्गदर्शनात आलापल्ली वनपरिक्षेत्राधिकारी किरण पाटील, क्षेत्र सहायक विनोद शिंदे, वनरक्षक प्रदीप गेडाम, वनरक्षक भगवान नागोसे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Sticks to the forest fire