शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून आलेली खराब नोट घेण्यास स्टेट बँकेचा नकार

By admin | Updated: March 19, 2015 01:25 IST

येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून काढण्यात आलेल्या ५०० रूपयाच्या नोटेवर काळा डाग असल्याने ती घेण्यास बँक अधिकाऱ्याने नकार दिला व आपल्याला उद्धट वागणूक दिली,.....

चामोर्शी : येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून काढण्यात आलेल्या ५०० रूपयाच्या नोटेवर काळा डाग असल्याने ती घेण्यास बँक अधिकाऱ्याने नकार दिला व आपल्याला उद्धट वागणूक दिली, असा आरोप रणजीत नारायण सातपुते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून रणजीत नारायण सातपुते यांनी १७ मार्च २०१५ ला सकाळी ११.३३ वाजता १० हजार रूपये व ११.३४ वाजता ५ हजार रूपये असे एकूण १५ हजार रूपये काढले. यातील १४ हजार ५०० रूपये दुसऱ्याच्या खात्यावर टाकण्यासाठी रोखपालाकडे दिले असता, त्यातील ५०० रूपयाची एक नोट चालत नाही म्हणून त्यांनी परत केली. ६ डब्ल्यू ९८३१३७ या क्रमांकाच्या नोटेच्या मध्यभागी काळा डाग आहे, म्हणून ती परत करण्यात आली. त्यानंतर बँक व्यवस्थापकाकडे जाऊन या नोटेसंबंधीची माहिती त्यांना दिली. त्याला आम्ही जबाबदार नाही, तुम्हाला जे करायचे असेल ते करा, असे म्हणून त्यांनी हाकलून लावले, असा आरोपही सातपुते यांनी केला आहे. फाटक्या व जुन्या नोटा बदलवून देण्याची तरतूद असतानाही त्याच बँकेच्या एटीएममधून काढलेली फाटकी नोट बदलवून न देणाऱ्या कर्मचारी व व्यवस्थापकावर कारवाई करण्यात यावी, अशी सातपुते यांची मागणी आहे. यासंदर्भात चामोर्शी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापक एस. जी. माटे यांना विचारणा केली असता, आपल्याकडे लेखी तक्रार नसल्याने याप्रकरणी काहीही बोलता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)