चामाेर्शी मार्गाचे काम आठ दिवसांत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST2021-02-05T08:49:33+5:302021-02-05T08:49:33+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : शहरातील चामाेर्शी मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला सुरुवात करावी, अन्यथा आंदाेलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ...

Start work on the Chamarshi route in eight days | चामाेर्शी मार्गाचे काम आठ दिवसांत सुरू करा

चामाेर्शी मार्गाचे काम आठ दिवसांत सुरू करा

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : शहरातील चामाेर्शी मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला सुरुवात करावी, अन्यथा आंदाेलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे. गडचिराेली ते चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला मंजुरी मिळाली आहे. कंत्राटदाराने गडचिराेली शहरातून एक बाजू बनविली आहे. याला आता सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, कंत्राटदाराने दुसऱ्या बाजूस सुरुवात केली नाही. एकाच बाजूने वाहने जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दुसरी बाजू अतिशय खड्डेमय झाली आहे तसेच धुळीच्या त्रासामुळे दुकानदार, सभाेवतालच्या घरांमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. गडचिराेली शहराबाहेर रस्त्याचे काम सुरू आहे. गडचिराेली शहरातील वर्दळ लक्षात घेता या कामाला प्राधान्य देण्याची गरज हाेती. मात्र, अजूनपर्यंत कामाला सुरुवात केली नाही.

Web Title: Start work on the Chamarshi route in eight days