माॅडेल काॅलेज लवकर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST2021-01-14T04:30:21+5:302021-01-14T04:30:21+5:30

गडचिराेली : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून माॅडेल काॅलेज गाेंडवाना विद्यापीठाला हस्तांतरित झाले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी उच्च ...

Start model college early | माॅडेल काॅलेज लवकर सुरू करा

माॅडेल काॅलेज लवकर सुरू करा

गडचिराेली : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून माॅडेल काॅलेज गाेंडवाना विद्यापीठाला हस्तांतरित झाले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता माॅडेल काॅलेज प्रत्यक्ष सुरू करण्याची कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन जिल्हा शाखा गडचिराेलीच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात राज्यपालांच्या नावे प्रभारी कुलसचिव डाॅ.अनिल चिताडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. रमेश हलामी, काेषाध्यक्ष आनंद कंगाले, तालुकाध्यक्ष अमरसिंग गेडाम, संघटक आनंद मडावी, खुशाल मडावी, सूरज मडावी, भूपेंद्र गेडाम आदी उपस्थित हाेते.

गाेंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी गरीब असल्याने विविध प्रकारचे शैक्षणिक शुल्क कमी करावे, पीएचडीच्या विद्यार्थ्यांचे संशाेधन केंद्राचे शुल्क सध्या १० ते ७ हजार रुपये आहे. प्रत्येक सत्राचे वेगळे शुल्क आहे. ते कमी करून नाममात्र ठेवण्यात यावे. गाेंडवाना विद्यापीठात नव्याने मुलांकरिता ५०० व मुलींकरिता ५०० प्रवेश क्षमता असलेले वसतिगृह निर्माण करावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

Web Title: Start model college early