शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
3
"मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
4
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
5
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
6
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
7
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
8
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
9
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
10
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
11
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
12
सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
13
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
14
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
15
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
16
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
17
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
18
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
19
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
20
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
Daily Top 2Weekly Top 5

जलदिंडीस चामोर्शीतून प्रारंभ

By admin | Updated: May 29, 2015 01:12 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चामोर्शी तालुक्यातील जलदिंडी काढण्यात येणार असून या उपक्रमाची सुरूवात चामोर्शी येथे बुधवारी करण्यात आली.

जलयुक्त शिवार अभियानाबाबत जनजागृती : तालुक्यातील गावांमध्ये फिरणार वाहन
चामोर्शी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चामोर्शी तालुक्यातील जलदिंडी काढण्यात येणार असून या उपक्रमाची सुरूवात चामोर्शी येथे बुधवारी करण्यात आली.
पंचायत समिती सभापती शशिकला चिळंगे व तळोधी ग्राम पंचायतीच्या सरपंच माधुरी सुरजागडे यांच्या हस्ते जलदिंडीच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी व्ही. ए. रजपूत, मंडळ कृषी अधिकारी ए. बी. उभे, कृषी पर्यवेक्षक ए. आर. चव्हाण, ए. एच. पिल्लारे, कृषी सहाय्यक भांडेकर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी रजपूत यांनी जलदिंडी कार्यक्रमाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून सांगितले. दिवसेंदिवस जलपातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचलविला पाहिजे, असे मार्गदर्शन केले.
सदर वाहन चामोर्शी तालुक्यातील तळोधी, कुरूड, भाडभिडी, थाटरी, जामगिरी, वसंतपूर, घोट या गावांमध्ये फिरून जलयुक्त शिवार अभियानाबाबत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करणार आहे. (शहर प्रतिनिधी)