शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

एसटी आगारात खड्ड्यांचे साम्राज्य

By admin | Updated: July 19, 2015 01:49 IST

स्थानिक एसटी आगार परिसरातील डांबर पूर्णपणे उखडून गेला असल्याने प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत.

प्रवाशी त्रस्त : मागील तीन वर्षांपासून आगाराचे डांबरीकरण रखडले
गडचिरोली : स्थानिक एसटी आगार परिसरातील डांबर पूर्णपणे उखडून गेला असल्याने प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. याचा त्रास प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांना होत आहे. त्यामुळे या परिसरात डांबर टाकून खड्डे बुजवावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
गडचिरोली बसस्थानकात एसटी बसला प्रवेश करण्यासाठी व बाहेर निघण्यासाठी स्वतंत्र मार्ग देण्यात आले आहेत. या दोन्ही मार्गावरही खड्डे पडले आहेत. बसस्थानकाच्या अगदी समोरसुध्दा खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे एसटीचेही नुकसान होते. मार्गावर खड्डे असल्याचे कारण पुढे करून बऱ्याचवेळा एसटी महामंडळ बसेस रद्द करते. मात्र आगारातच प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असताना याकडे दुर्लक्ष झाले आहे. एसटी महामंडळाला कार्पोरेट करून प्रवाशांना आपल्याकडे आकर्षीत करून त्यांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने तरी सदर खड्डे बुजविणे आवश्यक आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाण साचून राहते. बसस्थानकासमोरचा भाग खोलगट असल्याने या ठिकाणीतर प्रचंड पाणी साचून राहते. आगाराने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
धुळीचा त्रास वाढला
बसस्थानक परिसरातील डांबर उखडून गिट्टी बाहेर निघली आहे. याठिकाणी दिवसभर बसेस ये-जा करतात. बसेस आल्यानंतर किंवा जातेवेळी खड्ड्यांमधील धूळ उडून याचा त्रास प्रवाशांना व एसटीतील कर्मचाऱ्यांनाही होत आहे. त्यामुळे डोळ्याचे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे आगाराने लक्ष देणे गरजेचे आहे.