दिव्यांगांचा पाच टक्के निधी पूर्णपणे खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:30+5:302021-02-05T08:50:30+5:30

गडचिराेली : दिव्यांगांना साेयीसुविधा देणे व त्यांचा विकास साधणे, याकरिता जिल्हा परिषदेला शासनाकडून पाच टक्के निधी प्राप्त हाेताे. हा ...

Spend five per cent of the disabled fund in full | दिव्यांगांचा पाच टक्के निधी पूर्णपणे खर्च करा

दिव्यांगांचा पाच टक्के निधी पूर्णपणे खर्च करा

गडचिराेली : दिव्यांगांना साेयीसुविधा देणे व त्यांचा विकास साधणे, याकरिता जिल्हा परिषदेला शासनाकडून पाच टक्के निधी प्राप्त हाेताे. हा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून खर्च केला जात नाही. त्यामुळे अनेक दिव्यांग हक्काच्या साेयीसुविधांपासून वंचित राहतात. या गंभीर समस्येची दखल घेऊन संपूर्ण पाच टक्के निधी खर्च करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटनेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधव व विद्यार्थी याेजनांच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील दिव्यांग विद्यार्थी बांधवांना ई-सायकल देण्यात यावे, जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना राेजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात. दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तपासणी व नाेंदणीची साेय करावी. जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला शासकीय याेजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देताना प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख मंगेश पोरटे, तालुका अध्यक्ष राकेश करंगुलवार, विनोद औतकार, रामा मडावी, राकेश मडावी उपस्थित हाेते.

Web Title: Spend five per cent of the disabled fund in full