शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा तालुक्याला होणार तेलंगणा राज्यातून वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:40 IST

सिरोंचा : चंद्रपूरच्या महाऔष्णिक विद्युत केंद्रातून आतापर्यंत सिरोंचा तालुक्याला होत असलेल्या वीज पुरवठ्यात अनेक अडचणी येत होत्या. मध्ये लागणाऱ्या ...

सिरोंचा : चंद्रपूरच्या महाऔष्णिक विद्युत केंद्रातून आतापर्यंत सिरोंचा तालुक्याला होत असलेल्या वीज पुरवठ्यात अनेक अडचणी येत होत्या. मध्ये लागणाऱ्या जंगलाच्या भागामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असे. पण आता ही समस्या कायमची दूर होणार आहे. चक्क तेलंगणा राज्याच्या सरकारी वीज कंपनीमार्फत आता तालुक्याला वीज पुरवठा केला जाणार असून त्याची तयारी जोमाने सुरू आहे.

सिरोंचा तालुक्याला लागून असलेल्या आणि सिरोंचापासून २२ किलोमीटरवर असलेल्या किष्टमपेठ येथील १३२ किलोवॅट सब स्टेशनवरून सिरोंचाला वीज पुरवठा घेतला जाणार आहे. त्यासाठी सिरोंचा येथील ६६ केव्हीचे सब स्टेशन वाढवून ते १३२ केव्हीचे केले जात आहे.

या पद्धतीने तेलंगणातून वीज पुरवठा घेऊन तालुक्याची वीज समस्या दूर करावी, अशी अनेक दिवसांची मागणी होती. तेलंगणातील रामगुंडम येथील ४००० मेगावॅटच्या महाऔष्णिक विद्युत केंद्रातून किष्टमपेठच्या १३२ केव्ही सब स्टेशनला वीज पुरवठा होतो. तेथून तो आता सिरोंचापर्यंत लांबवला जात आहे. किष्टमपेठ व सिरोंचा सबस्टेशन जोडल्यानंतर तालुक्यातील रेगुंठा, झिंगानूर येथेही छोटे सबस्टेशन होणार असून प्रत्येक गावात घरगुती आणि शेतीच्या वापरासाठी वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.

(बॉक्स)

११३ टॉवरची उभारणी जोमात

किष्टमपेठ ते सिरोंचा या दरम्यान वीज वाहून आणण्यासाठी ११३ टॉवरच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. याशिवाय अजून लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहणही सुरू आहे. या कामानंतर आलापल्लीवरून विद्युत पुरवठा खंडित झाला तरी तेलंगणातून तो सुरू राहणार आहे.

(बॉक्स)

जंगलामुळे वीज पुरवठ्यात अडथळा

सध्या आष्टी-आलापल्ली या मार्गाने सिरोंचा तालुक्याला वीज पुरवठा होतो. मार्गात घनदाट जंगल असल्यामुळे पावसाळ्यात वादळी वाऱ्याने झाड पडून किंवा एकमेकांना स्पर्शून वीज पुरवठा खंडित होतो. याशिवाय पुराच्या पाण्यात सिरोंचाजवळील विद्युत खांब पाण्यात बुडून वीज पुरवठा बंद होतो. ही समस्या आता दूर होणार आहे.