नऊ कृषी केंद्रांना कारणे दाखवा

By Admin | Updated: September 18, 2014 23:34 IST2014-09-18T23:34:41+5:302014-09-18T23:34:41+5:30

देसाईगंज तालुक्यातील ९ कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी जी. आर. कापसे यांनी दिली आहे.

Show reasons to nine agricultural centers | नऊ कृषी केंद्रांना कारणे दाखवा

नऊ कृषी केंद्रांना कारणे दाखवा

देसाईगंज तालुका : कृषी विकास अधिकाऱ्यांची माहिती
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील ९ कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी जी. आर. कापसे यांनी दिली आहे.
देसाईगंज तालुक्यातील पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण अधिकारी एस. ए. थोटे यांनी तालुक्यातील ९ कृषी केंद्रांमध्ये अनियमितता आढळल्याने कारणे दाखवा नोटीस बजाविल्या आहे. यामध्ये नाकाडे कृषी केंद्र, पारस कृषी केंद्र, शेतकरी कृषी केंद्र, जयकिसन माणिकलाल फाफट कृषी केंद्र, साई कृषी केंद्र, कृषी विकास केंद्र, निरंकारी कृषी केंद्र वडसा, संकेत कृषी केंद्र मोहटोला, चंदन कृषी केंद्र किन्हाळा, संजिवनी कृषी केंद्र कोरेगाव यांचा समावेश आहे. संबंधीत सर्व कृषी केंद्रांमध्ये कमाल किंमतीहून अधिक दराने रासायनिक खताची विक्री करणे, ज्या खताची विक्री करीत आहे. त्या संबंधीत कंपनीचे उगम प्रमाणपत्र परवान्यामध्ये समाविष्ट नसणे, खत साठा तपशील, किंमत सूची प्रदर्शीत न करणे, तसेच विहीत केलेल्या पद्धतीनुसार अभिलेख लेखापुस्तीका आदी न ठेवणे, खत विक्री बल एम फार्ममध्ये न देणे, या अनियमितता आढळून आल्या. त्यामुळे संबंधीत कृषी केंद्रांना नोटीस बजाविण्यात आल्या आहे. तसेच कुरखेडा तालुक्यातील रामगड येथील दिनेश कृषी केंद्रामध्येही अनियमितता आढळल्याने पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर. एल. डफ यांनी सदर कृषी केंद्रास विक्रीबंद करण्यासंबंधी आदेश दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Show reasons to nine agricultural centers