शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

‘शेकाप’ही उतरणार मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा दिली नसल्यामुळे जिल्ह्यात सेनेचे अस्तित्वच पणाला लागले आहे. तीनपैकी किमान दोन मतदार संघ सेनेसाठी सोडावे अशी मागणी सेनेच्या नवनियुक्त जिल्हा प्रमुखांनी अलिकडेच केली होती. परंतू दोन तर नाहीच, एकही जागा सेनेला मिळाली नाही.

ठळक मुद्देगडचिरोलीत रंगत वाढणार : अहेरीतून अम्ब्रिशरावच राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काँग्रेस आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने जिल्ह्यातील तीनही मतदार संघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गडचिरोलीसह तीनही मतदार संघातील रंगत आणखी वाढणार आहे. दरम्यान नामांकन दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असताना अहेरी मतदार संघातील ‘सस्पेन्स’ बुधवारी रात्री दूर करत विद्यमान आमदार अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नावावर अखेर भाजपने शिक्कामोर्तब केल्याचे समजते. त्यामुळे आता या मतदार संघात पुन्हा जुन्याच पद्धतीने लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मंगळवारी गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघात भाजप व काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर बुधवारी अहेरीचा तिढा सुटेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र संध्याकाळपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ होती. मात्र रात्री उशिरा अम्ब्रिशराव यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त धडकले. दरम्यान शेतकरी कामगार पक्षाने गडचिरोली मतदार संघावर दावा करताना ही जागा आपल्याला देण्याची मागणी केली होती. परंतू शेकापला ही जागा न मिळाल्यामुळे तीनही जागांवर उमेदवार उभे करून मैत्रीपूर्ण लढण्याचा निर्णय पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती समितीने घेतला असल्याचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी कळविले.शिवसेनेचे अस्तित्व पणालाजिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा दिली नसल्यामुळे जिल्ह्यात सेनेचे अस्तित्वच पणाला लागले आहे. तीनपैकी किमान दोन मतदार संघ सेनेसाठी सोडावे अशी मागणी सेनेच्या नवनियुक्त जिल्हा प्रमुखांनी अलिकडेच केली होती. परंतू दोन तर नाहीच, एकही जागा सेनेला मिळाली नाही. त्यामुळे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय राहणार का, असा प्रश्न मतदारांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.शेवटच्या दिवशी होणार गर्दीप्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपैकी काही उमेदवार दि.३ ला नाममात्र नामांकन दाखल करणार आहेत. मात्र एबी फॉर्मसह आणि शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांनी ४ आॅक्टोबरचा मुहूर्त साधला आहे. त्यामुळे नामांकनाच्या शेवटच्या दिवशी सर्वच मतदार संघात निवडणुकीचा माहौल गरम राहणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019