शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरात साडेसात लाखांची दारू व सडवा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 05:00 IST

स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात पाेलीस पथक चामाेर्शी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत हाेते. दरम्यान विष्णूपूर गावाच्या परिसरात शेततळ्याच्या बाजूला गुळाच्या दारूची हातभट्टी लावण्यासाठी माेठ्या प्रमाणात सडवा टाकून साहित्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पाेलीस पथकाला मिळाली. पाेलिसांनी त्या ठिकाणी जावून पाहणी केली असता, माेहफुल दारू, सडवा व दारू निर्मितीचे साहित्य आढळून आले. 

ठळक मुद्देसहा आराेपी फरार, स्थानिक गुन्हे शाखेची जंगलात कारवाई; तळ्याच्या परिसरात हाेत्या भट्ट्या

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चामाेर्शी तालुक्याच्या विष्णूपूर जंगल परिसरात छापा मारून माेहफुलाची दारू, सडवा मिळून एकूण ७ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पकडला. याप्रकरणी एका महिला आराेपीसह सहा आराेपी फरार झाले आहेत.फरार आराेपींमध्ये कालाचंद विजय कीर्तनिया, कमल वासुदेव बिश्वास, विजय रमेन बिश्वास, जयंत माखन हलदर, मुकेश निदूर हलदर तसेच हाशी निरपीन शहा सर्व रा.विष्णूपूर ता.चामाेर्शी आदींचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात पाेलीस पथक चामाेर्शी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत हाेते. दरम्यान विष्णूपूर गावाच्या परिसरात शेततळ्याच्या बाजूला गुळाच्या दारूची हातभट्टी लावण्यासाठी माेठ्या प्रमाणात सडवा टाकून साहित्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पाेलीस पथकाला मिळाली. पाेलिसांनी त्या ठिकाणी जावून पाहणी केली असता, माेहफुल दारू, सडवा व दारू निर्मितीचे साहित्य आढळून आले. या ठिकाणी ६ लाख ४० हजार रुपये किमतीचे ३२  प्लास्टिक ड्रम तसेच ६ हजार ४००  लीटर गुळाचा सडवा आढळून आला. याशिवाय ३२ हजार रुपये किमतीची ३२  ड्रम गुळाची दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारा गुळाचा सडवा तसेच चार हजार रुपये किमतीचे चार लाेखंडी  ड्रम सापडले. याच परिसरात आणखी दुसरी कारवाई केली. त्यात घराशेजारी असलेल्या  शेतामध्ये एक महिला गुळ व माेहाची दारू विक्री करीत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. तिथे छापा टाकून १० हजार रुपये किमतीची हातभट्टीची दारू, ८० हजार रुपये किमतीचे प्लास्टिक  ड्रम आढळले. या दाेन्ही कारवाया मिळून ७ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :liquor banदारूबंदी