प्लास्टिक निर्मूलनाचे काम करणार शाळा

By Admin | Updated: September 18, 2014 23:34 IST2014-09-18T23:34:58+5:302014-09-18T23:34:58+5:30

स्थानिक शिवाजी वाचनालयात गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठी विज्ञान परिषद, गडचिरोली विभागाच्या सभेत प्लास्टिक प्रदूषण मुक्त

The school will do plastic eradication | प्लास्टिक निर्मूलनाचे काम करणार शाळा

प्लास्टिक निर्मूलनाचे काम करणार शाळा

गडचिरोली : स्थानिक शिवाजी वाचनालयात गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठी विज्ञान परिषद, गडचिरोली विभागाच्या सभेत प्लास्टिक प्रदूषण मुक्त कार्यक्रमाबाबत बुधवारी सायंकाळी चर्चा करण्यात आली व या संदर्भात शाळांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
गडचिरोली क्षेत्र प्लास्टिक प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना संबंधी २५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता न.प. गडचिरोली येथे सर्वांनी एकत्र येऊन नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन प्लास्टिक प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी शाळा, दुकाने, कार्यक्रमस्थळे आदी ठिकाणी समूपदेशन, रॅली, प्लास्टिक गोळा करणे, विल्हेवाट लावणे, स्टिकर लावून जनजागृती करणे आदी कार्यक्रम मुख्याध्यापक संघाच्या सहकार्याने करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापक संघाच्या पुढाकाराने हे कार्यक्रम राबविले जाणार आहे.
यावेळी सभेला कार्याध्यक्ष सूर्यकांत भोंगळे, उपाध्यक्ष अनिल शेट्ये, कार्यवाह प्रशांत तम्मेवार, सहकार्यवाह विशाखा काटवले, कोषाध्यक्ष देवेंद्र म्हशाखेत्री, सदस्य अर्चना राऊत, जगदीश म्हस्के, विवेक हुलके, प्रेमानंद सोनटक्के, राकेश चडगुलवार, नरेंद्र उंदीरवाडे, सल्लागार अविनाश गौरकार, राजेंद्र हिवरकर, संजय नार्लावार, मनिष शेटे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The school will do plastic eradication