शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोंढाळा वैनगंगा नदीपात्रातून रेतीची तस्करी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST

महसूल बुडत असूनही महसूल विभाग डोळेझाक करीत असल्याने रेती चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचे ...

महसूल बुडत असूनही महसूल विभाग डोळेझाक करीत असल्याने रेती चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचे दरवर्षी लिलाव होऊन लाखो, करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो. सद्यस्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने अवैध रेती चोरीचे प्रमाण वाढले आहे. ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करून विनापरवाना वाहतूक करून रेती तस्कर मालामाल होत आहेत. कोंढाळा गावानजीकच वैनगंगा नदी आहे. गावानजीक वैनगंगा नदीपात्र असल्याने नेमका याच संधीचा फायदा घेत काही ट्रॅक्टरधारक नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा करून रेती विक्री करीत असल्याचे आढळून येत आहे.

रेतीच्या उपशामुळे नदी पात्र खोलगट स्तरापर्यंत पोहोचले आहे. शेकडो ते हजारो ब्रास रेतीचा उपसा यापूर्वी झाला व सद्यस्थितीत सुरूच आहे. ट्रॅक्टरधारकांचे सर्वत्र धागेदोरे व जाळे पसरले असल्याने मोबाईलद्वारे सर्वत्र संपर्क करून इकडे-तिकडे हालहवाला घेतला जातो. रेतीचा अवैधरित्या उपसा केला जातो. रात्री १२ वाजल्यानंतरचा कालावधी रेती चोरांसाठी फलदायी असल्याचे कळते. लाखो रुपयांचा दंड आकारूनही दंडाला न जुमानता चलती का नाम गाडी असे चित्र निर्माण झाले आहे. रेती चोरीचे प्रकरण होऊ नये, यासाठी आणखी काही बदल करून रेती तस्करीला कसा आळा घालता येईल, याबाबत शासनस्तरावरून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.