शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कट मारून जाणाऱ्या ट्रकचालकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

एका पांढऱ्या रंगाच्या कारमधील लुटारू ट्रकचा पाठलाग करीत होते. मात्र ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आली नाही. ट्रकमध्ये ड्रायव्हर एकटाच असल्याचे बघून लुटारूंनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक थांबविला नाही. काही दूर पुन्हा ट्रकचा पाठलाग केल्यानंतरही ट्रक थांबत नसल्याने लुटारूंनी धावत्या कारमधून ट्रक चालकाच्या हाताला लोखंडी रॉड फेकून मारला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटला.

ठळक मुद्देरॉड फेकून मारला । नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कट मारून गेल्याच्या रागातून एका ट्रक चालकाला लुटण्याचा आणखी एक प्रकार तालुक्यात उघडकीस आला. यात धावत्या ट्रकचा पाठलाग करूनही ट्रक चालकाने वाहन न थांबविल्याने लुटारूंनी चालकाला लोखंडी रॉड फेकून मारला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. ही घटना कुरखेडा मार्गावर कोरचीपासून एक किमी अंतरावर शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. चालक मुनेश सिंग किरकोळ जखमी झाला आहे.छत्तीसगड राज्यातील रायपूरवरून लोंखडी पाईप घेऊन सीजी-०४, जेबी ८६२६ क्रमांकाचा ट्रक शनिवारी पहाटेच्या सुमारास छत्तीसगड राज्याची सीमा सोडत बोटेकसामार्गे महाराष्ट्राच्या सीमेत आला. त्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधील लुटारू ट्रकचा पाठलाग करीत होते. मात्र ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आली नाही. ट्रकमध्ये ड्रायव्हर एकटाच असल्याचे बघून लुटारूंनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक थांबविला नाही. काही दूर पुन्हा ट्रकचा पाठलाग केल्यानंतरही ट्रक थांबत नसल्याने लुटारूंनी धावत्या कारमधून ट्रक चालकाच्या हाताला लोखंडी रॉड फेकून मारला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटला.या अपघातात ट्रक चालक मुनेश सिंग याला किरकोळ दुखापत झाली मात्र जीव वाचला. यानंतर या टोळीने ट्रकच्या समोरचे काच फोडून चालकाला बाहेर काढून बेदम मारहाण केली. मारत-मारत कोरची गावाजवळ असलेल्या चहा-टपरीवर नेऊन बसविले. त्याच्या पोटाला चाकू लावून रोख रक्कम कुठे आहे सांग, अन्यथा जीवे मारू, अशी धमकी दिली. माझ्याकडे आहे तेवढे घेऊन जा मात्र मला मारू नका, अशी विनवणी ट्रकचालकाने केली. दोघांनी चालकाला पकडून ठेवले तर तिघांनी ट्रकची झडती घेतली. ट्रकची बॅटरी, दोन लोखंडी जॅक, ट्रकच्या केबिनमधला स्वयंपाक व रोजच्या वापराचे सामान, ताडपत्री, मोबाईल, ड्रायव्हिंग लायसन्स, चिल्लर पैसे व जोडे सुद्धा त्या लुटारूंनी नेले. यानंतर ते पळून गेले. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना वाहन चालकाने आपबिती सांगितली.विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वी कुरखेडा-कोरची मार्गावरील बेळगाव घाटावर दुचाकीस्वाराला लुटल्याची घटना घडली होती. त्यामुळे या भागात नक्षलवाद्यांच्या नावावर लुटणारी टोळी सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या टोळीला जेरबंद करणे आवश्यक आहे. या मार्गाने रायपूरवरून हैदराबादसाठी अनेक ट्रक धावतात. या ट्रक चालकांच्या जीवाला धोका होण्याची शक्तता नाकारता येत नाही.

टॅग्स :Robberyचोरी