शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील बसगाड्यांनी वाहतुकीला धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : देसाईगंज शहरातील मुख्य मार्गावर दुकानदारांचे अतिक्रमण वाढले असून, राज्य परिवहन महामंडळ तसेच अन्य खासगी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

देसाईगंज : देसाईगंज शहरातील मुख्य मार्गावर दुकानदारांचे अतिक्रमण वाढले असून, राज्य परिवहन महामंडळ तसेच अन्य खासगी वाहने रस्त्यावरच उभी राहात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, न. प. प्रशासनाची कारवाई थंडबस्त्यात आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातून आरमोरी-वडसा-कुरखेडा हा राज्य महामार्ग गेला आहे. त्यातच या मार्गावर बसस्थानक आहे. याच भागातून मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठीही अनेक मार्ग आहेत. शहरातील प्रत्येक भागात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याने हा परिसर नेहमीच वाहनांच्या वर्दळीने तसेच विक्रेत्यांच्या गर्दीने गजबलेला असताे. सध्या कोरोना महामारी आटोक्यात आल्याने सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने, बाजारपेठ, शाळा सुरु झाल्याने रस्त्यावर लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांचीच वर्दळ असते. शहरातील कुरखेडा टी पाईंट ते सार्वजनिक बांधकाम विभागाजवळील राज्य महामार्ग या परिसरात अतिक्रमण वाढले आहे. त्यातच ग्राहकांची वाहने, प्रतिष्ठानापर्यंत माल पोहोचविणाऱ्या गाड्या या रस्त्यावरच उभ्या राहात असल्याने वाहतुकीसाठी अत्यंत कमी रस्ता उपलब्ध हाेताे.

बसस्थानक परिसरात तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसेस लागतात. येथील वाढलेल्या अतिक्रमणामुळे या परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे पादचारी, शालेय मुले, आबालवृद्ध यांना जीव मुठीत घेऊनच येथून मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे या मुख्य राज्य महामार्गावरील अतिक्रमण संबंधित विभागांनी हटवून सुव्यस्थित वाहतुकीसाठी पर्याप्त मार्ग उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.